मोबाईल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:44 AM2020-02-17T11:44:08+5:302020-02-17T11:44:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शास्त्री मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची ...

Mobile shop broke | मोबाईल दुकान फोडले

मोबाईल दुकान फोडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील शास्त्री मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती़
संतोष इंदरलाल साहित्या यांच्या मालकीचे हे दुकान असून रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकाने उघडण्यासाठी गेले असता, शटर उचकटलेले दिसून त्यांनी आत प्रवेश करुन माहिती घेतली असता, दुकानातील मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजून आले़ चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले ४४ हजार रुपये रोख व १ लाख ७२ हजार ७३८ रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले़ घटनेची माहिती संतोष साहित्या यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, सहायक पोलीस निरीक्षक दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिºहाडे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली़
शास्त्री मार्केट हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे़ यातून परिसरात रहिवासी वस्तीही आहे़ उशिरापर्यंत या भागात नागरिकांची वर्दळ असते़ यातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्र ते रविवार पहाटे या दरम्यान चोरी केल्याचा पोलीसांचा अंदाज आहे़ दरम्यान चोरट्यांनी तब्बल ४४ नवे मोबाईल चोरुन नेल्याचे पंचनाम्यातून समोर आले होते़ घटनेनंतर पोलीस पथकाने श्वानाला पाचारण करुन माग काढण्याचा तसेच ठसेतज्ञांनी ठसे संकलित करुन चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे़ उशिरापर्यंत पोलीसांकडून परिसराची झडती घेण्यात येत होती़
याबाबत संतोष साहित्या यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़

दुकानमालक साहित्या हे मोबाईल विक्री करण्यासोबतच रिपेअरींगचेही काम करतात़ चोरी झाली त्यावेळी त्यांच्या दुकानात पाच ते सहा जणांचे मोबाईल रिपेअरींगसाठी आले होते़ चोरट्यांनी ते ही लंपास केले आहेत़ या मोबाईल्सची किंमत माहिती नसल्याने सोमवारी त्याची माहिती घेऊन पोलीसात पुन्हा नोंद होणार आहे़ यातून चोरीतील रकमेचा आकडा वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Mobile shop broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.