शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी केली सुधारित कापूस प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

सुधारित कापूस आदर्श पद्धती प्रकल्पास आमदार शिरीषकुमार नाईक यांनी भेट देत माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या ...

सुधारित कापूस आदर्श पद्धती प्रकल्पास आमदार शिरीषकुमार नाईक यांनी भेट देत माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या मार्गदर्शनाची माहिती घेतली.

प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रशांत देसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोरपाड्याचे माजी सरपंच अशोक पाेसल्या गावीत, शिवाजी सदाशिव गावीत, शंकर गावीत, योगेश मावची आदी उपस्थित होते.

यावेळी लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाउंडेशन नंदुरबार जिल्ह्यात दोन वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुधारित कापूस आदर्श पद्धती प्रकल्प राबवत आहे. बीसीआय व जीआयझेड अंतर्गत हे प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक देसले यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांना दिली. या प्रकल्पांतर्गत चिंचपाडा प्रकल्प कार्यालयांतर्गत ३४ गावांमध्ये ५ हजार १२ तरविसरवाडी कार्यालयांतर्गत ३१ गावांमधील ५ हजार ६०० शेतकऱ्यांना सुधारित कापूस पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना लाभ झाला असून शेतीतील खर्च करुन शाश्वत उत्पादन येत असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात पराग नाईक यांनी कापूस पीक महत्त्व, कीड रोगाची माहिती दिली. हा उपक्रम लुपिनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, प्रकल्प प्रमुख सुनील सैंदाणे, जिल्हा समन्वयक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी कौतुक करत तालुक्यातील शेतकऱ्यांना यातून लाभ होणार असल्याचे सांगितले.