आमदार, खासदारांचा विकास निधी पूर्ण खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST2021-04-22T04:31:30+5:302021-04-22T04:31:30+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील चारही आमदार व एक खासदार यांनी गेल्या आर्थिक वर्षात आपल्या विकास निधीतील संपूर्ण रक्कम खर्च केली ...

MLA, MP development fund full expenditure | आमदार, खासदारांचा विकास निधी पूर्ण खर्च

आमदार, खासदारांचा विकास निधी पूर्ण खर्च

नंदुरबार : जिल्ह्यातील चारही आमदार व एक खासदार यांनी गेल्या आर्थिक वर्षात आपल्या विकास निधीतील संपूर्ण रक्कम खर्च केली आहे. रस्ते, पाणी, वीज यावर सर्वाधिक खर्च झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात आमदार निधीची रक्कम प्रत्येकी तीन कोटी रुपये इतकी होती. त्यातून आमदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना विविध विकास कामे सुचविली होती. त्यात सर्वाधिक रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा यासह समाजमंदिर बांधकाम यांना प्राधान्य होते. मार्च अखेर हा सर्व निधी खर्च झाला आहे. याशिवाय गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना विकास निधीतील रक्कम कोरोना उपाययोजनेसाठी देण्याचे आवाहन केले होते. २० लाखांची मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु त्यापेक्षा अधिकचा विकास निधी आमदारांनी संबंधित फंडमध्ये जमा केला. पालकमंत्री के.सी. पाडवी व शहादा-तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्येकी ५० लाखांचा निधी, नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावीत यांनी ४० लाखांचा तर नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांनी २५ लाखांचा निधी जमा केला होता.

खासदार डॅा.हीना गावीत यांनीदेखील आपल्या निधीतील एक कोटीची रक्कम दिली होती. याशिवाय उर्वरित विकास निधीतून अनेक कामे सुचविली होती तो सर्व निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी दिली.

Web Title: MLA, MP development fund full expenditure