शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च आठ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोना संसर्ग झालेल्यांना आता म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराची भीती सतावत आहे. यातून हा आजार खर्चिक असल्याने शासनाने ...

नंदुरबार : कोरोना संसर्ग झालेल्यांना आता म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराची भीती सतावत आहे. यातून हा आजार खर्चिक असल्याने शासनाने त्याचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करत शस्त्रक्रियेसाठी दीड लाखांपर्यंतचा खर्च माफ केला आहे. परंतु, नंदुरबार जिल्ह्यात मात्र पाचच रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत असल्याने रुग्णालयांची संख्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळून आल्यानंतर खासगी रुग्णालयात किचकट अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवरही उपचार मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, या आजारावर मात करण्यासाठी लागणारी औषधी, इंजेक्शन्स तसेच इतर संदर्भ सेवा महागडी असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. एकीकडे ही धावपळ असताना म्युकरमायकोसिसबाबत गैरसमज असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना टाळले जात आहे. परिणामी ते त्यांची नावेही सांगत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा रुग्णालयातून मोफत औषधी..

म्युकरमायकोसिस आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही जिल्ह्यात मर्यादित आहे. आजार वाढीस लागलेल्या रुग्णांच्या जबडा किंवा दातांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. जनआरोग्य अंतर्गत दीड लाखाचा खर्च मंजूर झाला असला तरी अद्याप नियुक्त असलेल्या पाच पैकी केवळ एका ठिकाणी सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

जिल्हा रुग्णालयाने गुरुवारी यासंदर्भात बैठक घेत जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस बाधित रुग्णांना उपचार आणि औषधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी उपचार घेत असलेले तसेच उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांसह खासगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्यांनाही साहाय्य केले जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयातून नेमकी कोणती औषधे दिली जातील याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले तरी या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

वडील कोरोेनामुक्त होऊन घरी परत आल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसचा त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार मिळत आहे. उपचार मोफत असले तरीही खर्च होणार आहे.

-रुग्णाचा मुलगा,

नंदुरबार,

सुरत येथील खासगी रुग्णालयात भावावर उपचार सुरू आहेत. डोळा निकामी झाला आहे. कोरोनावर उपचार सुरू असतानाच हा आजार समोर आला होता. प्रकृती बरी होत असली तरी इंजेक्शन खूप महागडे असल्याने चिंता आहे.

-रुग्णाचा भाऊ,

नंदुरबार.,

म्युकरमायकोसिस एक जीवघेणा आजार आहे. यातून रुग्णांचा बचाव करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील दोन कान-नाक-घसा तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. वेळ पडल्यास जिल्ह्यातील निष्णात अशा कान-नाक-घास तज्ज्ञांची मदत घेऊन रुग्णांना उपचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे. रुग्णांचा आढावा घेतला जात आहे.

-डाॅ. आर. डी. भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार