जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांची पदे भरण्याची एमआयएमची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:46+5:302021-06-17T04:21:46+5:30

निवेदनात, जिल्ह्यात जिल्हा परिषद उर्दू शाळांमध्ये एकूण १०० पदे मंजूर आहेत. यातून सध्या ६७ शिक्षक कार्यरत असून ३३ पदे ...

MIM demands filling of posts of Urdu teachers in the district | जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांची पदे भरण्याची एमआयएमची मागणी

जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांची पदे भरण्याची एमआयएमची मागणी

निवेदनात, जिल्ह्यात जिल्हा परिषद उर्दू शाळांमध्ये एकूण १०० पदे मंजूर आहेत. यातून सध्या ६७ शिक्षक कार्यरत असून ३३ पदे ही रिक्त आहेत. नंदुरबार नगरपालिकेंतर्गत उर्दू शाळांमध्ये २५ पदे मंजूर करण्यात आली होती. यातही १९ शिक्षक सध्या कार्यरत असून ६ पदे ही रिक्त आहेत. एकूण ४५ पदे रिक्त असल्याने उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात पेसा कायदा लागू असला तरीही शासननिर्णय आणि राज्यघटनेतील कलमांनुसार उर्दू शाळांमध्ये आरक्षण लागू करता येणार नाही. या शाळांसाठी राखीव गटातील शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ही रिक्त पदे सामान्य प्रवर्गातून भरण्यात यावीत, तसेच अल्पसंख्याक संस्थांचे पवित्र पोर्टल लागू नसल्याने ही पदे जिल्हास्तरावर भरवण्यात यावीत. ही कारवाई पूर्ण न झाल्यास पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Web Title: MIM demands filling of posts of Urdu teachers in the district