वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य अधिवेशनाबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST2021-01-13T05:22:18+5:302021-01-13T05:22:18+5:30

या बैठकीला सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी, दत्तात्रय घाटगे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन ...

Meeting on State Convention of Newspaper Vendors Association | वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य अधिवेशनाबाबत बैठक

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य अधिवेशनाबाबत बैठक

या बैठकीला सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी, दत्तात्रय घाटगे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक राकेश पाण्डेय यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकीत सुनील पाटणकर, बालाजी पवार, विकास सूर्यवंशी, दत्ता घाडगे आदींनी अधिवेशनाबाबत माहिती दिली. याशिवाय अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत कोषाध्यक्ष गोरख भिलारे (पंढरपूर), संजय पावशे (मुंबई), विनोद पन्नासे (चंद्रपूर), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), सुनील मगर (नाशिक), संतोष शिरभाते (यवतमाळ), अण्णासाहेब जगताप (औरंगाबाद) यांच्यासह विविध जिल्ह्यांतील राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Meeting on State Convention of Newspaper Vendors Association