शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाबाबत नवापुरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

या बैठकीला पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पालिका मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, डॉ. अविनाश मावची,पोलीस ...

या बैठकीला पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पालिका मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, डॉ. अविनाश मावची,पोलीस निरीक्षक उपस्थित होते. तहसीलदार कुलकर्णी म्हणाले की, नवापूर तालुका कोरोनामुक्त करायचा आहे. यासाठी सर्वांनी कोरोना लस घेतली पाहिजे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर सर्वांनी लसीकरण केले पाहिजे. नवापूर शहर व तालुका कोरोनामुक्त व लसीकरण युक्त करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. डॉ. शशीकांत वसावे व डॉ. अविनाश मावची यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी ट्रस्टी गुलाब व्होरा म्हणाले की, रविवारपासून गढी भागातील मदरसा हॉल व इदगाह रोडजवळील सामाजिक सभागृह लसीकरण करण्यासाठी उपलब्ध करुन देऊ. कोरोना लसीबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त लसीकरण करुन घेण्याचे सर्व ट्रस्टी प्रयत्न करणार आहेत. गुलाम व्होरा यांनी तहसीलदारांना आश्वासित केले की, मशिदीमधून जाहीर आवाहन करुन यात सर्व धर्मगुरु जातीने सहभाग घेऊन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करुन दाखवू, असे सांगितले. भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाला हज किंवा उमराला जाण्यापूर्वी लसीकरण हे बंधनकारक आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजानेही स्वत:हून पुढाकार घेऊन लसीकरण करुन घ्यावे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचे आहे. लसीबाबत असलेले गैरसमज व अफवांपासून दूर राहून आपल्या आरोग्यासाठी लसीकरण चांगला पर्याय आहे. यावेळी जाकीर पठाण, इद्रीस टिनवाला, रमीज शेख, पमा सैयद, मौलाना सिध्दीक, मोलवी रफीक, सोहेल बलेसरिया, मौलाना अनवर आदी उपस्थित होते.