ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत शहाद्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:40 PM2019-11-22T12:40:02+5:302019-11-22T12:40:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात  मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार व ज्येष्ठ नागरिकांची समस्या ...

Meeting in the Martyrdom on issues of senior citizens | ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत शहाद्यात बैठक

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत शहाद्यात बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात  मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार व ज्येष्ठ नागरिकांची समस्या या विषयावर बैठक घेण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे म्हणाले की, आज देशात मुलींवर लैंगिक अत्याचार रोज वाढत आहे हे शासनाच्या लक्षात आले. या घटनांना आळा बसावा यासाठी मुलींना लैंगिक अत्याचाराविरुद्ध कसा प्रतिकार करावा तो संदेश ज्येष्ठ नागरिकांमार्फत घराघरात पोहचावा हा बैठकीचा उद्देश आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी  शहादा, धडगाव, म्हसावद, सारंगखेडा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना करण्यात आला. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील त्यांनी त्या सोडविण्यासाठी वरील पोली स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. 
बैठकीला पोलीस निरीक्षक के.एल. नजन-पाटील, शिवदास पाटील, जे.डी. पाटील, विवेक  पाटील, रमेश पाटील, रतीलाल पाटील, लियाकतअली सैयद, डी.जी. पाटील, के.डी. गिरासे, रामचंद्र सोनार, माणक चौधरी, गजानन विसपुते, सुरेश खेडकर, आनंदराव विसपुते, प्रताप चव्हाण, रामजी  पाटील, गोविंद पाटील, के.के. सोनार, दिलीप पाटील, सतीश सोनवणे, वसंत पाटील, तुकाराम सोमजी पाटील, गिरधर बिरारे  आदी उपस्थित होते.
 

Web Title: Meeting in the Martyrdom on issues of senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.