मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:18 IST2020-02-13T12:17:13+5:302020-02-13T12:18:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौºयाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू आहे. याशिवाय पोलीस यंत्रणा ...

Meeting of the Chief Minister started a session of meetings | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौºयाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू आहे. याशिवाय पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. साधारणत: दीड तास मुख्यमंत्री नंदुरबारात राहणार असून कार्यक्रमाच्या मिनिट टू मिनिट दौºयाचे नियोजन सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहा पेक्षा अधीक मंत्री शनिवार, १५ रोजी नंदुरबारात येत आहेत. पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन करून मेळाव्याला ते संबोधीत करणार आहेत. मुख्यमंत्री दौºयात कुठलीही शासकीय बैठक घेणार नसले तरी एखादी माहिती मागितल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून सर्व विभागांना माहिती संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय बैठकाही सुरू आहेत. पोलिसांनी देखील बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे हे हेलिपॅडने पोलीस कवायत मैदानावर येतील. तेथून संजय टाऊन हॉलजवळील जलतरण तलाव आणि तेथून जुन्या कोर्टाच्या जागेत पालिका इमारतीचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. तेथून ते जी.टी.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात सभेला संबोधीत करतील.
या दरम्यानच्या संपुर्ण मार्गाची दुरूस्ती करण्यात येत आहे. स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. कल्याणेश्वर मंदीराजवळील रस्त्यावरील गतीरोधक देखील काढण्यात येणार आहे. वळण रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संपुर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी नेमले जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या वेळी काही काळ वाहतूक रोखली जाणार आहे. तसे नियोजन पोलिसांकडून केले जात आहे. अधिकाऱ्यांनी या संपुर्ण रूटची पहाणी देखील केली. शुक्रवारी सायंकाळी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

Web Title: Meeting of the Chief Minister started a session of meetings