शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालय यंदापासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने जिल्हावासीयांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी त्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. याशिवाय अपुर्ण सिंचन प्रकल्पांसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे.राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले याविषयी नागरिकांमध्ये उत्सूकता होती. वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाने सकारात्मक भुमिका घेत निर्णय घेतला आहे.नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय आठ वर्षात दोन वेळा मंजुर झाले आहे. पहिल्या वेळी केवळ मंजुर करण्यात आले. महाविद्यलाय सुरू करण्यासंदर्भात काहीही हालचाली झाल्या नाहीत त्यामुळे ते केंद्रीय समितीने नामंजूर केले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी पुन्हा एकदा भाजप सरकारने त्याला मंजुरी दिली. मंजुरीनंतर महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आवश्यक त्या कार्यवाही गेल्या तीन वर्षात पुर्ण करण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था करून ते वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याच ठिकाणी महाविद्यालयासाठी असलेल्या आवश्यक इमारती, होस्टेलची सुविधा करण्यात येत आहे. केंद्रीय समितीने देखील दोन वेळा भेटी देवून हिरवी झेंडी दाखविली आहे. जिल्हा नियोजन समितीने तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करण्यासाठी सज्जता ठेवण्यात येत आहे.आता राज्याच्या अर्थसंकल्पात देखील नंदुरबारसह राज्यातील इतर दोन वैद्यकीय महाविद्यालये येत्या शैक्षणिक अर्थात २०२०-२१ या वर्षात सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. किती रक्कमेची तरतूद आहे हे स्पष्ट झाले नसले तरी असे असले तरी शासन स्तरावर त्यासाठी तरतूद करण्यात आल्याने आता महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अर्थ संकल्पात अपुर्ण सिंचन प्रकल्पांना १० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दहा पेक्षा अधीक प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. त्याचा फायदा नंदुरबारलाही होणार आहे. जिल्ह्यात एकुण १३ पोलीस ठाणे आहेत. त्यात आणखी एका पोलीस ठाण्याची भर पडणार आहे. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी या महिलाच राहणार आहेत.