केळी उत्पादनातील घट टाळण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:56 IST2020-03-04T12:55:35+5:302020-03-04T12:56:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : केळी उत्पादनात घट येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून नवीन केळी पीक संगोपनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना ...

Measures to curb banana production | केळी उत्पादनातील घट टाळण्यासाठी उपाययोजना

केळी उत्पादनातील घट टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : केळी उत्पादनात घट येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून नवीन केळी पीक संगोपनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात केळीचे घड मोठे होऊन झाड झुकून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी वर्गाकडून नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने केळीच्या खांबांना बांधण्यात येत आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील सुलवाडे, रायखेड, म्हसावद आदी गावांमध्ये केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. केळी पीक वाचवण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहेत. केळीच्या शेतीत लागवडीपासून ते तोडणीपर्यंत निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात झाडांना आधार देणे ही एक महत्वाची पद्धत आहे. या पद्धतीत नायलॉन दोरीचा वापर करून झाडांना आधार देण्यात येतो. ही पद्धत झाडांना घड आल्यानंतर करतात. त्यामुळे वारा-वादळ आले तर झाडांची तग धरून ठेवण्याची क्षमता वाढते व होणारे नुकसान टळते.

Web Title: Measures to curb banana production