शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

चौगाव शिवारात माथेफिरुने २२ एकरातील ऊस जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालक्यातील चौगाव शिवारातील चार शेतकऱ्यांच्या २२ एकरातील ऊस अज्ञात माथेफिरुने जाळला. त्यात चारही ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालक्यातील चौगाव शिवारातील चार शेतकऱ्यांच्या २२ एकरातील ऊस अज्ञात माथेफिरुने जाळला. त्यात चारही शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.मागील वर्षी तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील भागात काही शेतकºयांच्या ऊसाला वेगवेगळ्या कारणांनी आग लागली होती. त्यात माथेफिरुने देखील ऊस जाळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांची यंदाही पनरावृत्ती होऊ लागली आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चौगाव शिवारात लागवड केलेल्या ऊसाला अज्ञात माथेफिरुने आग लावली आहे. त्यात प्रविण लक्ष्मण पाटील यांचा सर्वाधिक नऊ एकरातील ऊस, चंपालाल मिश्रीलाल जैन यांचा सह एकर, हिम्मत सोमनाथ चौधरी यांचा चार एकर तर मोहन पुंडलीक चौधरी यांच्या तीन एकर असा एकुण २२ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.या नुकसानीबद्दल तळोदा पोलीसात तक्रार करण्यात आली असून नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला आहे. दरम्यान अशा माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी बोरद, मोड, मोरवड, रांझणी, चौगाव या भागातील शेतकºयांमार्फत करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळोदा तालुक्यातील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पाऊस व अवकाळी पावसात केवळ ऊसाचे पिकक वाचले आहे. परंतु हे पीकही माथेफिरुंनी लक्ष्य केल्यामुळे भिती पसरली आहे. अशा घटनांच्या बंदोबस्तसाठी पोलीस प्रशासनाकडून तातडीने उपायययोजना करण्याची मागणी होत आहे.