चौगाव शिवारात माथेफिरुने २२ एकरातील ऊस जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:01 PM2019-12-11T12:01:03+5:302019-12-11T12:02:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालक्यातील चौगाव शिवारातील चार शेतकऱ्यांच्या २२ एकरातील ऊस अज्ञात माथेफिरुने जाळला. त्यात चारही ...

 Mathefiru burnt 3 acres of sugarcane in Chaugaon Shivar | चौगाव शिवारात माथेफिरुने २२ एकरातील ऊस जाळला

चौगाव शिवारात माथेफिरुने २२ एकरातील ऊस जाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालक्यातील चौगाव शिवारातील चार शेतकऱ्यांच्या २२ एकरातील ऊस अज्ञात माथेफिरुने जाळला. त्यात चारही शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील भागात काही शेतकºयांच्या ऊसाला वेगवेगळ्या कारणांनी आग लागली होती. त्यात माथेफिरुने देखील ऊस जाळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांची यंदाही पनरावृत्ती होऊ लागली आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चौगाव शिवारात लागवड केलेल्या ऊसाला अज्ञात माथेफिरुने आग लावली आहे. त्यात प्रविण लक्ष्मण पाटील यांचा सर्वाधिक नऊ एकरातील ऊस, चंपालाल मिश्रीलाल जैन यांचा सह एकर, हिम्मत सोमनाथ चौधरी यांचा चार एकर तर मोहन पुंडलीक चौधरी यांच्या तीन एकर असा एकुण २२ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
या नुकसानीबद्दल तळोदा पोलीसात तक्रार करण्यात आली असून नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला आहे. दरम्यान अशा माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी बोरद, मोड, मोरवड, रांझणी, चौगाव या भागातील शेतकºयांमार्फत करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळोदा तालुक्यातील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पाऊस व अवकाळी पावसात केवळ ऊसाचे पिकक वाचले आहे. परंतु हे पीकही माथेफिरुंनी लक्ष्य केल्यामुळे भिती पसरली आहे. अशा घटनांच्या बंदोबस्तसाठी पोलीस प्रशासनाकडून तातडीने उपायययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Mathefiru burnt 3 acres of sugarcane in Chaugaon Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.