शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात चौकातील मारुतीही कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ तासांच्या जनता कर्फ्यूमध्ये तळोद्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ सकाळी सातपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ तासांच्या जनता कर्फ्यूमध्ये तळोद्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ सकाळी सातपासून घरात बसून असलेले नागरीक सायंकाळी पाच वाजता थाळीनादाला बाहेर आले होते़ त्यानंतर ते पुन्हा घरात गेले़तळोदा शहरातील व्यापारी आणि नागरिक यांचा दिवस चौकातील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुरु होतो़ परंतू रविवार मात्र याला अपवाद ठरला होता़ सकाळी सहापासून होणाऱ्या गर्दीऐवजी याठिकाणी कुलूप लावण्यात आले होते़ यातून अनेकांनी बाहेरुनच हात जोडून दर्शन घेत कोरोनाला दूर पळवण्याची प्रार्थना केली़ जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे, प्रशांत राठोड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त तैनात केला होता़तळोदा शहरातील स्मारक चौक, मेनरोड, हुतात्मा चौक, मारुती मंदिर परिसर, कॉलेज रोड चौफुली, बसस्थानक परिसरा सर्वच ठिकाणी कर्फ्यूमुळे सामसूम होती़ नागरिकांनी सहभागी होत असताना सोशल मिडियातून मात्र कोरोनाची जागृतीही सुरु ठेवल्याचे दिसून आले होते़ तळोदा शहरातून दररोज जाणाºया ट्रकांची संख्याही नगण्य झाल्याने बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्ग व शेवाळी-नेत्रंग महामार्ग ओस पडले होते़