शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी नियंत्रणासाठी शहाद्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू असल्याने शहरात गर्दीचेप्रमाण वाढले होते. बुधवारी पालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू असल्याने शहरात गर्दीचेप्रमाण वाढले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने अनावश्यक दुकान उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यवसायिकांनी यास प्रतिसाद देत आपापले व्यवसाय बंद ठेवले.१७ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने व्यावसायिकांनी अनावश्यक दुकाने उघडू नये अन्यथा पालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिला आहे. २१ एप्रिलला शहरात कोरोना विषाणू बाधित रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने शहरात कंटेनमेंट व बफर झोनची निर्मिती करून अत्यावश्यक सेवेचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. नऊ पैकी एक बाधित रूग्ण मयत झाला असून, दोन बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सहा रूग्ण उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत २५ एप्रिल नंतर शहरात नवीन बाधित रूग्ण आढळून आला नसल्याने गेल्या काही दिवसापासून प्रशासनाने अत्यावश्यक सेवांसह इतर व्यवसायिक प्रतिष्ठान उघडी ठेवून व्यवसाय करण्यास मुभा दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा दुष्परिणाम प्रशासनाला दिसायला लागला.शहरात गर्दीचे प्रचंड प्रमाण वाढल्याने प्रशासन सुद्धा हतबल झाले होते. अखेर बुधवारी पालिकेच्या पथकामार्फत अनावश्यक दुकाने उघडी ठेवून अन्य व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईला सुरूवात झाली. सर्वप्रथम पालिकेतर्फे व्यवसायिकांना विनंती करण्यात आल्यानंतर व्यावसायिकांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकाने बंद केल्याने पालिकेच्या पथकाने कुठलीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्यावतीने १७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे.शहरातील भाजी मंडई परिसर पुरुषोत्तम मार्केट, युनियन बँक परिसर, मुख्य रस्ता, दोंडाईचा रोड आदी भागात कारवाई करण्यात आली. शहरात नागरिकांची गर्दी वाढू नये यासाठी मुख्य रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्वत: हातात पोलिसांची काठी घेऊन कारवाईला सुरूवात केल्याने सर्वच अचंबित झाले होते. पथकात स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, अभियंता संदीप टेंभेकर, सचिन महाडीक, माधव गाजरे, चेतन गांगुर्डे यांचा समावेश होता. विनाकारण नागरिकांनी गर्दी करू नये आवशक्यता असली तरच घराच्या बाहेर पडावे, प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळली तर शहरात कोरोना विषाणूचे संकट कमी होईल व आपली वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू होईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.