लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आठ लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमर्दे येथील माहेर व धुळे येथील सासर असलेल्या मोनिका विलास चौधरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विवाह झाल्यापासून मोनिका यांचा सासरची मंडळी छळ करीत होती. पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे यासाठी तसेच पतीलाच कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून त्यांच्या मागे सासरची मंडळी तगादा लावत होती. त्याला कंटाळून त्यांनी नंदुरबार तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून पंकज जयवंत पवार, जयवंत रामदास चौधरी, कविता उत्तम नेरकर, अश्विनी जयवंत चौधरी सर्व रा.वाडीभोकर, धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}