बाजार पेठेची वेळ सात ते पाच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:06 PM2020-07-07T12:06:55+5:302020-07-07T12:07:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार ...

Market time should be seven to five | बाजार पेठेची वेळ सात ते पाच करावी

बाजार पेठेची वेळ सात ते पाच करावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार शिरिष नाईक यांच्या उपस्थितीत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत घेण्यात आला.
शहरातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल ३ जुलैला पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाकडून दोन दिवस शहर बंद ठेवण्यात आले. दरम्यान सोमवार पासून बाजारपेठेची वेळ दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आली होती. सोमवारपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. दडी मारलेला पाऊस गेल्या तीन दिवसापासून सुरू झाल्याने शेतीपयोगी साहित्य घेण्यासाठी शेतकरी शहरात येताहेत. सलग दोन दिवस बाजार बंद केल्याने सोमवारी बाजारात एकच गर्दी झाली. या वेळी कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची स्थिती होती.
कोरोना बाधित वृध्दा गेल्या दहा दिवसापासून नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. बाजारपेठेची वेळ कमी केल्याने शहरात गर्दी होणारच या मताशी व्यापारी व नागरीक सहमत असल्याची भावना आमदार शिरीष नाईक यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभुमीवर त्यांनी पालिकेच्या बहुउद्देशिय सभागृहात बैठक घेतली. बैठकीत तहसीलदार सुनीता जºहाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, मुख्याधिकरी राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिकेचे गटनेता आशिष मावची, विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी तथा नगरसेवक उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा सारासार विचार करून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय आमदार नाईक यांनी घेतला. त्यांच्या सुचनांवर अंमल करण्यासाठी प्रशासन आपल्या आधीच्या निर्णयात बदल करून बाजारपेठेची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी करीत असल्याचे तहसलीदार सुनीता जºहाड यांनी सांगितले.
बैठकीत पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात स्वयंसेवक नेमण्यात येत असून, त्यांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती दिली. कोरोनापासून कसा बचाव करावा याबाबत स्वयंसेवक प्रभागनिहाय जनजागृती करतील असे ते म्हणाले.
दरम्यान, मंगलदास पार्क मधील कोरोना बाधित वृद्धेच्या संपर्कातील सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोमवारी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरातील जनता पार्क परिसरातील ५५ वर्षीय पुरूष नंदुरबार येथे उपचार घेत असून, त्यांनाही कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची व त्यांच्या संपर्कातील परिवाराच्या सदस्यांना होम क्वॉरंटाईन केले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे तसेच आवश्यक काम असल्याशिवार घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार शिरीष नाईक यांनी केले.

Web Title: Market time should be seven to five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.