४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:50 IST2020-05-05T11:50:45+5:302020-05-05T11:50:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध ...

 The market is full after 40 days | ४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध दुकाने सुरु झाल्याने बाजारात गर्दी उसळली होती़ यातून विविध भागात वाहतूक कोंडी होऊन पोलीस आणि नागरिक यांच्या तू-तू मै-मै झाल्याचे दिसून आले़
आॅरेंज झोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अत्यावश्यवक सेवांसह विविध व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती़ यातून सोमवारी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याची मुदत देण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासून शहरातील शास्त्री मार्केट, माणिक चौक, सुभाष चौक, गणपती मंदिर रोड परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, तहसील कार्यालय परिसर यासह विविध भागातील कापड दुकाने, चप्पल-बूट विक्री, मोबाईल दुकाने, हार्डवेअर, प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानांसह जनरल स्टोअर्स सुरु करण्यात आले़ शहरातील विविध भागात हातगाडी लावून वस्तू विक्री करणारेही सकाळी हजर झाले होते़ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकही शहरात आले होते़ यातून हाट दरवाजा, उड्डाणपुल, एकलव्य हायस्कूल, स्टेशन रोड या भागात वाहतूक कोंडी झाली़ जुनी नगरपालिका परिसरात वाहने लावणाऱ्यांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने पायी चालणेही मुश्किल झाले होते़
वाहतूक शाखेकडून समज देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली़ प्रशासनाने स्टेशनरोड भागात आखलेल्या जागांवर हातागाड्या लावल्या गेल्याने बाजारात कोंडी होत होती़ पोलीसांनी समज दिल्यानंतर काही गाड्या दुसºया रस्त्यांकडे वळवण्यात आल्या़

४१२ वाजेनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत यासाठी पोलीस अधिकाºयांनी फिरुन सूचना केल्या होत्या़
४बाजार सुरु झाल्याची माहिती ग्रामीण भागात मिळाल्यानंतर तेथून महिला आणि पुरुष दुचाकी व तीनचाकी वाहनांनी शहरात येत होते़ प्रारंभी बहुतांश आदिवासी महिलांनी बँकांबाहेर गर्दी करुन रांगा लावल्या होत्या़ पैसे काढून बाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मातांना बँकेबाहेरच दुपार झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे दिसून आले़
वाहतूक शाखेकडून बेशिस्तपणा करणाºया वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली़ यातून जुनी नगरपालिका चौकात बराच वेळ पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद रंगले होते़ ग्रामीण भागातून आलेल्या काहींची वाहने जप्त करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती़
सराफ बाजार सकाळी ९ वाजेपासून सुरु झाला होता़ परंतू तीन तासात म्हणावी तशी उलाढाल होऊ शकली नाही़ सर्वच व्यावसायिकांनी दुकानांची सफाई करण्यावर भर दिल्याने ग्राहकांची तुरळक संख्या होती़ काही ठिकाणी मोड देण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेले दिसून आले़
मंगळवारी शहराचा आठवडे बाजार आहे़ हा बाजार होतो किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी गर्दी होण्याची शक्यता आहे़
सकाळी सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता़ थुंकणाºयांवर कारवाई करणारे पथकही दिसून आले नाही़

Web Title:  The market is full after 40 days