शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दहा रिक्त पदांमुळे मंदाणे आरोग्य केंद्राचे कामकाज वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेले मंदाणे हे मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. या ...

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेले मंदाणे हे मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. या गावाशी सुमारे ४० ते ४५ खेडेगावांतील नागरिकांची दैनंदिन बाजारहाट व अन्य कामांसाठी मोठी वर्दळ असते. या ठिकाणी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे; मात्र येथील विविध समस्या पाहिल्यास आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे. जमीनदोस्त झालेले वॉल कंपाऊंड, शस्त्रक्रिया इमारतीची झालेली पडझड, वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची मोडकळीस आलेली इमारत, पाण्याची तीव्र समस्या, कर्मचाऱ्यांची कमतरता, शवविच्छेदन गृह फक्त नावालाच अशा विविध समस्या असल्याने या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.

१० जागा रिक्त

मंदाणे आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्णांची संख्या मोठी असते. या भागातील शहाणे व वाघर्डे येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र कार्यान्वित असले तरी या दोन्ही आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावे ही मंदाणे गावाच्या जवळपास असल्याने तेथील रुग्णांना मंदाणे गाव आरोग्य केंद्रात येणे सोयीचे असल्याने याच आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असते; मात्र या केंद्रात आस्थापनेवरील कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सर्व भार आरोग्य सेविकांवर आहे. या केंद्रात औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही दोन्ही पदे एक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे औषधी व गोळ्या वाटपाचे कामही आरोग्य सेविकांना करावे लागते. रुग्णांचे रक्त व लघवी तपासणी कर्मचाऱ्यांअभावी केली जात नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद तातडीने भरणे अत्यावश्यक आहे. तसेच मंदाणे आरोग्य उपकेंद्र क्रमांक एकमध्ये आरोग्यसेविका व एमपीडब्ल्यू दोन्ही पदे रिक्त आहेत. मंदाणे उपकेंद्र क्रमांक २ व असलोद उपकेंद्र या दोन्ही ठिकाणीदेखील एमपीडब्ल्यू ही पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर याच आरोग्य केंद्रात शिपाई एक, सफाईगार एक, लिपिक एक, तसेच आरोग्य केंद्रातील ओपीडीसाठीचे आरोग्यसेविकेचे पदही रिक्त आहे. एकूण १० पदे रिक्त असल्याने खूप गैरसोय होत आहे. डॉक्टरने रुग्णांची तपासणी केल्यानंतर पुढील सर्व भार आरोग्यसेविकांवर येतो. त्यात रुग्णाला इंजेक्शन देणे, ड्रेसिंग करणे, गोळ्या औषधे देणे, गावात विविध आरोग्य उपक्रमांत सहभागी होणे अशी कामे करणे आरोग्यसेविकांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे येथील सर्व पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना महामारीची भर

या आरोग्य केंद्रात संख्या अपूर्ण असताना येथील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोरोना महामारीमुळे कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे काम करणे कसरतीचे ठरत आहे. मंदाणे व परिसरात कोरोना बाधितांची संख्या व मृत्युसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही महामारी आटोक्यात आणणे आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत आहे. लसीकरण करणे, कोरोना टेस्ट करणे, सर्व्हे करणे, बाधित रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे, त्यांना मोठ्या रुग्णालयात रवाना करणे, विलगीकरण कक्षात दाखल करणे एवढ्या कामाचा भार वाढलेला असताना जिल्हा परिषद प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला येथील रिक्त जागा तातडीने भरण्यासंबंधी आदेशित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.