शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव रिटर्न डॉक्टरमुळे सुरू झाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचर यांच्या पत्नीसह चार लोकांचे बुधवारी स्वॅब घेण्यात आले.या वेळी संपूर्ण गाव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना करण्यात आल्या असून, अत्यावश्यक सेवा वगळता गाव १०० टक्के बंद ठेवून व्यापारी व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न असलेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. या वेळी तत्काळ पशुसंवर्धन दवाखाना कर्मचारी निवासस्थान व परिसर संपूर्ण बंदीस्त करण्यात आला. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून गाव निर्जंतुकीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून १० लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, परिचर व त्यांच्या पत्नीस अशा चार लोकांचे स्वॅब घेऊन पाठवण्यात आले आहे. उर्वरित लोकांचेही स्वॅब घेण्यात येतील, अशी माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवाल येत नाही तोपर्यंत गावात सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान बुधवारी जनता कर्फ्युत ग्रामस्थ व व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.चार लोकांच्या अहवालाची प्रतीक्षा सारंगखेडावासीयांना लागून आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, घरात राहून आपले आरोग्य जपावे. तीन दिवस पूर्णत: जनता कर्फ्यूसाठी सहकार्य करावे. पॉझिटिव्ह व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली असले तर स्वत:हून प्रशासनाला माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आव्हान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशिलाबाई मोरे, पोलीस निरीक्षक चंद्र्रकांत सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदेव ठाकरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, ग्राम विकास अधिकारी संजय मंडळे आदींनी केले आहेहोमिओ पॅथिक आरसोनिक अल्बम ३० हे औषध कोरूना विरुद्धच्या लढ्यात प्रभावी उपचार म्हणून उपयुक्त ठरत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील १२ हजार लोकांना होमिओ पॅथिक औषधांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.