शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार- ॲड.के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

विभागामार्फत जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत बागायती शेतीसाठी ८ लाख व कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी ५लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, ...

विभागामार्फत जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत बागायती शेतीसाठी ८ लाख व कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी ५लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

नंदुरबारतर्फे शहादा येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्मारक वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभातपी रतन पाडवी, महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार, ॲड. गोवाल पाडवी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येतील. भूमीहीन आदिवासींना शेतीसाठी जमिन उपलब्ध करुन दिल्यास त्यांना उपजिविकेचे साधन प्राप्त होईल.

जिल्ह्यात २ लाख कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यापैकी काहींची

नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरीत पात्र कुटुंबांचीदेखील लवकरच नोंदणी करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. शबरी आवास योजनेंतर्गत १२ हजार लाभार्थींना लाभ देण्यात येईल.

घरकुलासाठी जमीन घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी मका,

तूर आणि सोयाबीन या पर्यायी पिकांची पेरणी करावी. टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील

आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा योजना करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. योजना राबविताना पाण्याच्या शाश्वत स्त्रोत असल्याची खात्री करावी असे सांगितले.

आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिक्षणाच्या चांगल्या योजनांचा

लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जि.प.अध्यक्षा श्रीमती वळवी यांनी केले.

माजी मंत्री वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते एकूण मोहिदा व

लोणखेडा गावातील ५४७ लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात खावटी कीटचे वाटप करण्यात आले.