शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अंशदायी ऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनीच पेन्शन योजना कायम ठेवा व अंशदायी पेन्शन योजना तातडीने बंद करावी असा ठराव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुनीच पेन्शन योजना कायम ठेवा व अंशदायी पेन्शन योजना तातडीने बंद करावी असा ठराव जिल्हा पेन्शनसर असोसिएशनच्या अधिवेशनात करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे वार्षिक सभा व मेळावा झाला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष सीताराम शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष काशिनाथ राठोड,        सचिव मधुकर साबळे, सहसचिव दिलीप पाटील, विश्वस्त रामभाऊ कोळी, रमेश माळी आदी   उपस्थित होते. अध्यक्ष सीताराम शेवाळे यांनी सन 2017-18 व 2018-19 च्या वार्षिक लेखा परिक्षण, तेरीज, ताळेबंद व नफातोटा पत्रकांस मंजुरी देण्यासह 2019-20 च्या अंदाज पत्रकांस मंजुरी देणे तसेच 2019-20 या आर्थिक वषार्साठी सनदी लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे हे विषय मांडले. त्यास सवार्नुमते मान्यता देण्यात आली. शेवाळे यांनी सांगितले की, आदिवासीबहुल वस्तीच्या जिल्हयात पेन्शनर संघटनेचे काम सेवाभावी वृत्तीने व नि:स्वार्थपणे सहका:याच्या सहकार्याने सुरु असून जिल्हयातील सहा तालुक्यातील सर्व संवर्गाचे दहा हजार पेन्शनर संघटनेत आहेत. सेवानिवृत्तासाठी दरमहा पेन्शन अदालत, कोषागारात तिमाही मेळावे, जिल्हा कार्यकारी मंडळाच्या त्रैमासिक सभा, निवृत्त सेवा पुरस्कार, पेन्शनर भवनांबाबत माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी पेन्शनरांच्या कार्यक्रमास येवून समाधान वाटले. समाजासाठी आपण देत असलेले योगदान व त्याबाबतची तळमळ महत्वाची असल्याचे सांगितले. अनेक कर्मचारी 35 ते 38 वर्ष शासकिय सेवा करुन सेवानिवृती नंतरच्या इनिंगला सामोरे जात असतात. याकरीता आरोग्य चांगले राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जगदाळे यांच्या हस्ते संघटनेसाठी उत्कृष्ट कार्य करणा:या सेवानिवृत्त सभासद विमल सुभाष पाटील, कैलासपुरी रामपुरी     गोसावी, उखाभाऊ गणपत पिंपरे, न्याहलिक धुडकू शिरसाठ, उमाबाई मगन पाडवी, तोताराम जंगलू भोई, मगन मक्कन पाटील, आनंदा विष्णू विसपुते, विष्णू फत्तू पाडवी, प्रतिभा काशिनाथ मेहेते यांना  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल,पुष्पगुच्छ देवून   निवृत्त सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.प्रास्ताविक सचिव मधुकर साबळे यांनी व सुत्रसंचालन प्रल्हाद भावसार यांनी केले. आभार रामभाऊ कोळी यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी कार्यकारी मंडळांचे सदस्य व जिल्हा पदाधिकारी, तालुका व नगरपारिषद संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, पेन्शनर्स असोसिएशनचे सर्व सभासदांनी सहकार्य केले.

केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा. केंद्राप्रमाणे वैद्यकिय भत्ता दरमहा हजार रुपये दयावा. केंद्राप्रमाणे वयोपरत्वे पेन्शन 1 जानेवारी 2016 पासून लागू करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी. अंशदायी पेन्शन योजना तातडीने बंद करावी. सर्व स्तरावरील सेवानिवृत्तांना दरमहाचे पेन्शन एक तारखेस मिळावे. केंद्राप्रमाणे राज्यातही पेन्शनरांसाठी स्वंतत्र मंत्रालय असावे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिंसेबर 2018 अखेरचा 36 महिन्याचा उर्वरित फरक एकाच हप्त्यात द्यावा.