शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणातील निवडणुकीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्थात निवडणूक घ्यावी ...

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणातील निवडणुकीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्थात निवडणूक घ्यावी की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. त्यावर ६ जुलैला निर्णय होणार असला तरी सुरुवातीला शांत असलेले जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. विशेषत: भाजपतर्फे ज्येष्ठ नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची लहान कन्या डॉ.सुप्रिया गावीत यांनी उमेदवारी अर्ज भरताच महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र आले आहेत. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी ही जिल्ह्यात प्रथमच एकत्र येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे एकूण ५६ गट असून गेल्या निवडणुकीत या ५६ पैकी २३ काँग्रेस, २३ भाजप, तीन राष्ट्रवादी आणि सात शिवसेना असे सदस्य विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित केली होती. विशेष म्हणजे सभापती निवडीत भाजपलाही वाटा दिला. त्यामुळे राजकारणाचे समीकरण काहीसे वेगळे होते. दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून जिल्हा परिषदेतील ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन तेथे आता नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ज्या ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते ते सर्व बिगर आदिवासी सदस्य आहेत. मात्र या ठिकाणी जनरलचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवार आता उमेदवारी करू शकतील. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे जिल्ह्यात कालपर्यंत राजकीय वातावरण शांत होते. सर्वच पक्षांना या निवडणुका आता नको असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र २ जुलैला होणारी सुनावणी आता न्यायालयाने ६ जुलैला ठेवली आहे. न्यायालय काय निर्णय देते तो भाग वेगळा पण ५ जुलैपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने राजकीय घडामोडी रात्रीतून गतिमान झाल्या आहेत. जर न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली नाही तर उमेदवारांना अर्ज भरता येणार नाही म्हणून सर्वच पक्षांनी उमेदवारांचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. किंवा न्यायालयाने अर्ज भरल्यानंतर ‘जैसे थे’ ठेवून विधान परिषद निवडणूकप्रमाणेही स्थगिती मिळू शकते, असाही एक प्रवाह व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेत निवडणुकीचे गांभीर्य घेतले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा सुरू होत असतानाच भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या व खासदार डॉ.हीना गावीत यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावीत यांनी कोळदा व खापर या दोन गटातून उमेदवारी अर्ज भरले आहेत. सुप्रिया गावीत यांचा उमेदवारी अर्ज साहजिकच विरोधकांसाठी आव्हानात्मक असल्याने कालपर्यंत तीन दिशेला असलेले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते शनिवारी मात्र तातडीने एकत्र आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी हे दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुक्कामी आहेत. त्यांच्याच उपस्थितीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, काँग्रेसतर्फे माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे उपस्थित असल्याचे वृत्त आहे. या तिन्ही पक्षातील नेत्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढविण्याच्या विचारात असून त्याला पहिल्याच चर्चेत बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते. केवळ शहादा तालुक्यातील काही गटांबाबत चर्चा अपूर्ण असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याबाबत देखील एकमत होईल, असा या आघाडीच्या नेत्यांचा विश्वास आहे.

महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपपुढे निश्चितच मोठे आव्हान राहणार असल्याचे चित्र आहे. सुप्रिया गावीत यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निश्चितच भाजप जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनासाठी डावपेच आखत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपला कुठल्याही परिस्थितीत रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन शह देण्यासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आहे.