ज्वारी खरेदी केंद्र अचानक बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:47+5:302021-06-17T04:21:47+5:30

नंदुरबार : येथील एकात्मिक ज्वारी धान्य खरेदी केंद्र लागलीच बंद करण्यात आले आहे. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांची ज्वारी विक्रीची बाकी ...

Loss of farmers due to sudden closure of sorghum procurement center | ज्वारी खरेदी केंद्र अचानक बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

ज्वारी खरेदी केंद्र अचानक बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नंदुरबार : येथील एकात्मिक ज्वारी धान्य खरेदी केंद्र लागलीच बंद करण्यात आले आहे. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांची ज्वारी विक्रीची बाकी आहे. तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांनी पालकमंत्री के. सी. पाडवी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील ज्वारी खरेदी केंद्र फक्त १५० शेतकऱ्यांची १००० क्विंटल ज्वारी खरेदी करून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना आपला माल परत न्यावा लागला. फक्त ३० टक्केच माल खरेदी केला गेला, अजून ७० टक्के शेतकऱ्यांचा माल बाकी आहे.

खरेदी केंद्रचालकांकडे याबाबत संपर्क साधला असता, आम्हाला शासनाने एक हजार क्विंटलच ज्वारी खरेदी करण्याचे आदेश आहेत. तेवढी आम्ही केल्याचे म्हटले आहे. बाजारात ज्वारीला फक्त ११०० रुपये भाव आहे. त्यामुळे मोठे नुकसान होणार म्हणून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाच्या हमीभावाने खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

याबाबत तातडीने कार्यवाही करून केंद्र सुरू करावे, अशी मागणी या निवेदनात राजेंद्र पाटील यांनी केली आहे.

Web Title: Loss of farmers due to sudden closure of sorghum procurement center