शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपासून लॅाकडाऊनमध्ये शिथीलता मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून ते १४ एप्रिलपर्यंत जिल्हाअंतर्गत संपूर्ण लॅाकडाऊन जारी करण्यात आले होते. तर १५ एप्रिलपासून ...

नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून ते १४ एप्रिलपर्यंत जिल्हाअंतर्गत संपूर्ण लॅाकडाऊन जारी करण्यात आले होते. तर १५ एप्रिलपासून राज्य सरकारने लॅाकडाऊन जारी केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सलग दोन महिन्यांचे लॅाकडाऊन झाले आहे. परिणामी व्यापारी वर्ग पूर्र्णत: हवालदिल झाला असून दोन महिन्यापासून व्यवसाय नसल्याने हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १ जून पासून लॅाकडाऊनमध्ये शिथीलता मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा घसरलेला ग्राफ लक्षात घेता लॅाकडाऊन नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथीलता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजनाला सुरूवात केली आहे.

व्यापारी संघटना सरसावल्या

गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारी संघटना लॅाकडाऊन शिथीलतेच्या मागणीसाठी सरसावल्या आहेत. यापूर्वीच सर्व संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता तालुकास्तरावर संघटना निवेदने देत आहेत. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यात सर्व व्यापारी संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी प्रशासनासमोर कैफियत मांडली होती.

भाजपचाही इशारा

भाजपने यापूर्वीच असहकाराचा इशारा दिला आहे. आता पुन्हा निवेदन देऊन सायंकाळपर्यंत व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॅाकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक कोलमडले आहेत. दुकानाचे भाडे, वीज बील यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना उभे करण्यासाठी राज्य शासनाकडे काहीही योजना नाही. किमान लॅाकडाऊन शिथील करून तरी त्यांना व्यावसायाची परवाणगी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात विजय चौधरी यांनी केली आहे.

निवेदनावर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी यांच्यासह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.