शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आडगावच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पार्वतीबाई सायसिंग रावताळे या दुकानात १२ मार्च रोजी धान्य वाटप सुरू असताना गहू, तांदळाचे मोजमाप करताना प्रत्येक लाभार्थीला तीन ते पाच किलो धान्य कमी देत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केली असता दादागिरीची भाषा वापरुन तुम्ही माझे काहीच करु शकत नाही, असे म्हटले व माल वाटप कमी प्रमाणात देत होते. त्यावेळेस गावकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेऊन रेशन वाटप बंद केले व वजन काटा व कमी असलेल्या धान्याच्या पिशव्या उपसरपंच परशुराम ठाकरे व उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये जप्त केले. दुसºया दिवशी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता त्यांनाही कमी धान्य वाटप होत असल्याचे निदर्शनास आले. या दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करुन रेशन दुकानदार श्रीमती पार्वतीबाई सायसिंग रावताळे यांचा रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.