शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

लेवा गुजर समाजाचा मुंबईत स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : समस्त लेवा गुजर समाज मंडळातर्फे ठाणे येथे स्नेहवर्धक स्नेहमेळावा घेण्यात आला. मेळाव्यात विविध क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : समस्त लेवा गुजर समाज मंडळातर्फे ठाणे येथे स्नेहवर्धक स्नेहमेळावा घेण्यात आला. मेळाव्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, कुलस्वामिनी अन्नपूर्णा माता व स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.योगेश पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर.टी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील गुजर मंडळाच्या अध्यक्षा शोभना पाटील, विविध शहर ग्राम ग्लोबल गुजर मंडळाचे अध्यक्ष मोहन पटेल, जीसीसीएचे अध्यक्ष आर.वाय. पाटील, कृषीतज्ज्ञ अनिल पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुंबई मंडळाचे अध्यक्ष डॉ.हितेश सुभाष पाटील यांनी केले. त्यानंतर मुंबई समाज मंडळाच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विविध शहर ग्राम ग्लोबल गुजर मंडळाच्या शहादा, शिरपूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, बडोदा, भरुच, अंकलेश्वर, औरंगबाद, सुरत येथील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी समाजाच्या चालीरिती, परंपरा, संस्कार आदींबाबत मनोगत व्यक्त केले. पत्रकार नुपूर मधुरकर पाटील हिने समाज प्रबोधनावर पत्रवाचन केले.मंडळाच्या वतीने यंदाचा ‘जलमित्र’ पुरस्कार शहादा येथील जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘वृक्षमित्र’ पुरस्कार फेस, ता.शहादा ग्रामस्थांना देण्यात आला. मंडळाच्या वतीने गुजर गौरव पुरस्कार हे अनुक्रमे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती नंदुरबार, स्व.योगेशभाई उत्तमभाई पाटील (फेस) यांना मरणोत्तर, महेश राजाराम पटेल (जांबोलीकर) ह.मु.ठाणे, प्राचार्य डॉ.मुकेश पाटील (पाडळदेकर) ह.मु.नवी मुंबई, शरद उद्धव चौधरी (अलखेड) ह.मु.ठाणे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपट सृष्टीचे महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट माल्या यांनी महानायकाची हुबेहूब नक्कल करून मेळाव्यात मनोरंजन केले. तसेच लहान बालकांनी व महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन संगीता पाटील व आशा पाटील यांनी तर आभार मंडळाचे सचिव अनिल पाटील यांनी मानले. डॉ.हेमंत पाटील, विनायक पाटील, डॉ.मुकेश पाटील, महेश पाटील, डॉ.अनिल पाटील, हेमंत पाटील, देवराम पाटील, विनोद पाटील, प्रकाश पाटील, संगीता पाटील, नीलेश पटेल, प्रमोद पटेल, दिनेश पटेल, प्रमोद मोहन पटेल, सुनील पटेल, महेंद्र चौधरी व मुंबई गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.