लेवा गुजर समाजाचा मुंबईत स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:09 PM2019-12-11T12:09:57+5:302019-12-11T12:10:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : समस्त लेवा गुजर समाज मंडळातर्फे ठाणे येथे स्नेहवर्धक स्नेहमेळावा घेण्यात आला. मेळाव्यात विविध क्षेत्रात ...

The Leva Gujar community should meet in Mumbai | लेवा गुजर समाजाचा मुंबईत स्नेहमेळावा

लेवा गुजर समाजाचा मुंबईत स्नेहमेळावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : समस्त लेवा गुजर समाज मंडळातर्फे ठाणे येथे स्नेहवर्धक स्नेहमेळावा घेण्यात आला. मेळाव्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, कुलस्वामिनी अन्नपूर्णा माता व स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.योगेश पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर.टी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील गुजर मंडळाच्या अध्यक्षा शोभना पाटील, विविध शहर ग्राम ग्लोबल गुजर मंडळाचे अध्यक्ष मोहन पटेल, जीसीसीएचे अध्यक्ष आर.वाय. पाटील, कृषीतज्ज्ञ अनिल पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुंबई मंडळाचे अध्यक्ष डॉ.हितेश सुभाष पाटील यांनी केले. त्यानंतर मुंबई समाज मंडळाच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विविध शहर ग्राम ग्लोबल गुजर मंडळाच्या शहादा, शिरपूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, बडोदा, भरुच, अंकलेश्वर, औरंगबाद, सुरत येथील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी समाजाच्या चालीरिती, परंपरा, संस्कार आदींबाबत मनोगत व्यक्त केले. पत्रकार नुपूर मधुरकर पाटील हिने समाज प्रबोधनावर पत्रवाचन केले.
मंडळाच्या वतीने यंदाचा ‘जलमित्र’ पुरस्कार शहादा येथील जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘वृक्षमित्र’ पुरस्कार फेस, ता.शहादा ग्रामस्थांना देण्यात आला. मंडळाच्या वतीने गुजर गौरव पुरस्कार हे अनुक्रमे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती नंदुरबार, स्व.योगेशभाई उत्तमभाई पाटील (फेस) यांना मरणोत्तर, महेश राजाराम पटेल (जांबोलीकर) ह.मु.ठाणे, प्राचार्य डॉ.मुकेश पाटील (पाडळदेकर) ह.मु.नवी मुंबई, शरद उद्धव चौधरी (अलखेड) ह.मु.ठाणे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपट सृष्टीचे महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट माल्या यांनी महानायकाची हुबेहूब नक्कल करून मेळाव्यात मनोरंजन केले. तसेच लहान बालकांनी व महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन संगीता पाटील व आशा पाटील यांनी तर आभार मंडळाचे सचिव अनिल पाटील यांनी मानले. डॉ.हेमंत पाटील, विनायक पाटील, डॉ.मुकेश पाटील, महेश पाटील, डॉ.अनिल पाटील, हेमंत पाटील, देवराम पाटील, विनोद पाटील, प्रकाश पाटील, संगीता पाटील, नीलेश पटेल, प्रमोद पटेल, दिनेश पटेल, प्रमोद मोहन पटेल, सुनील पटेल, महेंद्र चौधरी व मुंबई गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The Leva Gujar community should meet in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.