शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

...बोगस डॉक्टरांना तरी काम करू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव पहाता रुग्णांना वाचविण्यासाठी बोगस डॉक्टरच ऐनवेळी दुर्गम भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव पहाता रुग्णांना वाचविण्यासाठी बोगस डॉक्टरच ऐनवेळी दुर्गम भागात धावून येतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करतांना त्या बाजूचाही विचार केला पाहिजे. किंबहुना आधी पुरेसे अधिकारी, कर्मचारी नेमा व नंतरच अशा डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. बैठकीस उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती रतन पाडवी, अभिजीत पाटील, निर्मला राऊत यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आरोग्याच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाली. सदस्य भरत गावीत यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. आधीच आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, पुरेसा अधिकारी, कर्मचारीवर्ग नाही त्यामुळे स्थानिक डॉक्टरच रुग्णांचा जीव वाचवत आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई करतांना या बाजूचाही विचार केला गेला पाहिजे. ग्रामिण व दुर्गम भागात बोगस डॉक्टर राहणार नाहीत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागेल असेही गावीत यांनी स्पष्ट केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले, आदिवासी जिल्हा म्हणून विशेष बाब लक्षात घेता स्थानिक ठिकाणीच भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. शिवाय सर्व आरोग्य केंद्रांचा अहवाल घेवून वाहने मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. देवमन पवार यांनी आरोग्य केंद्र कुणाच्या भरवशावर चालतात हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेत सदस्यांच्या कामांसाठी देखील संबधित अधिकारी व कर्मचाºयाला पैसे द्यावे लागतात, तरच काम होते. सदस्यांची ही गत तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शिक्षणाच्या विषयावर विजय पराडके यांनी जुने धडगाव शाळेची इमारत पडकी असल्याचे सांगितले. ३६ वस्ती शाळा शिक्षकांना सेवेत सामाूवन घेण्याचाही मुद्दा उपस्थित केला. शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून संबधीत शिक्षकांची शासन पात्रतेत बसत नसल्याने शासनाकडून निर्णय होत नसल्याचे सीईओ यांनी सांगितले.मधुकर नाईक यांनी तारापूर येथील शाळेत एकही शिक्षक नसल्याचे निदर्शनास आणून दिले.अर्चना गावीत यांनी प्रशासन काळात एमपीआर अंतर्गत किती कामे झाली. एकाच ठेकेदाराला एवढी कामे कशी दिली गेली. कामे केली नाहीत तरीही पैसे काढले गेले , तशा ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे गावीत यांनी सांगितले. सीईओ यांनी अशा ठिकाणची यादी द्या, मी स्वत: त्या ठिकाणी भेटी देवून चौकशी करणार असल्याचे सांगितले.दुर्गम भागात हातपंपांना पाणी आहे, परंतु ते सुरू नसल्यामुळे त्यांचा उपयोग नाही. गावठाण फिडरवरून वीज पुरवठा करावा अशी मागणी देखील करण्यात आली. अध्यक्षा सिमा वळवी यांनी कंत्राटी बेसवर टेंडर काढून वाहने व कर्मचारी घेवू व अशा कुपनलिका सुरू करू असे सांगितले.बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा झाली.नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांची ही पहिलीच स्थायी समितीची सभा होती. पहिली बैठक असली तरी अध्यक्षा व उपाध्यक्षांनी सदस्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. बºयाच वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आरोग्य, शिक्षण आणि बांधकामाच्या विषयांवर सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले. यापुढील बैठकांमध्ये आणखी चांगली आणि अभ्यासात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. आता सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागून आहे.