खेतिया परिसरात बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:07 PM2020-05-25T12:07:19+5:302020-05-25T12:08:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील भडगोन परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे़ यामुळे वनविभागातर्फे याठिकाणी २ पिंजरे व ट्रॅप ...

Leopard infestation in agricultural areas | खेतिया परिसरात बिबट्याचा संचार

खेतिया परिसरात बिबट्याचा संचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्यप्रदेशातील भडगोन परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे़ यामुळे वनविभागातर्फे याठिकाणी २ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे़ भडगोन रस्त्यालगत रजियोद्दीन शेख व फहीमोद्दीन शेख यांच्या शेतात दोन बिबटे दिसून आल्यानंतर ही मोहिम सुरु करण्यात आली आहे़
शेख यांच्या शेतातील रखवालदाराला गेल्या आठवड्यात दोन बिबटे रात्री दिसून आले होते़ त्याने ही माहिती शेतमालकांना दिली होती़ याबाबत वनविभागाचे पानसेमल वनमंडळाचे अधिकारी मंगेश बुंदेला, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक राजू पाटील यांना कळवण्यात आले होते़ त्यांनी याठिकाणी पाहणी केल्यावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते़ यानंतर दक्षता म्हणून तातडीने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत़
दरम्यान या भागात बिबट्याचा सातत्याने संचार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांजवळ येणारा बिबट्या आतमध्ये जात नसल्याचे कॅमेºयातून दिसून आले आहे़ तसेच दिवसभर या भागात शेतीची कामे सुरु असतात त्यावेळी बिबट्या दिसून येत नाही़ परंतू रात्री बिबट्यांचा संचार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ गेल्या महिन्यात खेतिया परिसरातील बांद्रीयबड येथे दोन बिबटे वनविभागाने लावलेल्या पिंजºयात कैद झाले होते़ त्यानंतर पु्न्हा या भागात बिबटे फिरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ वनविभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कता बाळण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार जनजागृती सुरु आहे़
सेंधवा वनविभागाचे अधिकारी डीएफओ श्रीराम मेहता , एसडीएफओ विजय गुप्ता, वनमंडळ अधिकारी मंगेश बुंदेला, खेतियाचे राजू पाटील यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील यांचे पथक बिबट्यांचा शोध घेत आहे़

महाराष्ट्र व मध्यप्रदेश हद्दीत बिबट्या फिरत असल्याची माहिती असल्याने दोन्ही राज्यातील वनविभागाचे पथक बिबट्यावर लक्ष ठेवून आहे़ नर आणि मादी बिबट्या असण्याचा अंदाज आहे़

 

Web Title: Leopard infestation in agricultural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.