वाडी पुनवर्सन येथे सात वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:17 IST2020-06-10T12:17:03+5:302020-06-10T12:17:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/शहादा : वाडी पुनवर्सन ता़ शहादा येथे ७ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री ...

Leopard attack on seven-year-old girl at Wadi Rehabilitation | वाडी पुनवर्सन येथे सात वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

वाडी पुनवर्सन येथे सात वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा/शहादा : वाडी पुनवर्सन ता़ शहादा येथे ७ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ घटनेनंतर बालिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे़
निकिता होमा वळवी असे बालिकेचे नाव आहे़ तुळाजा ता़ तळोदा येथील रहिवासी असलेली निकिता सोमवारी दुपारी आईसह वाडी पुनवर्सन येथे आली होते़ दरम्यान सायंकाळी पुनर्वसन शिवारातील शेतालगत खेळत असताना शेतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला २५ फूट शेतात ओढून नेले होते़ यावेळी बालिका रडून आरडाओरडा करत असल्याचा आवाज आल्याने तिच्या आईसह नातेवाईकांनी दगड मारुन बिबट्याला पळवूल लावले़ घटनेत निकिता हीच्या डोके आणि मानेवार बिबट्याने चावा घेत नख मारल्याने ती जखमी झाली़ तिला तातडीने रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याठिकाणी उशिरापर्यंत आमदार राजेश पाडवी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी यांनी भेटी दिल्या़
मध्यम आकाराचा बिबट्या असल्याची माहिती वाडी येथील प्रत्यक्षदर्शींनी दिली असून तो शेतातून आल्याचा अंदाज आहे़ या भागात एकापेक्षा अधिक बिबटे असावेत असा अंदाज असून वनविभागाचे पथक सकाळपासून या भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे शोधून पिंजरे लावण्याची कारवाई करत होते़

Web Title: Leopard attack on seven-year-old girl at Wadi Rehabilitation