शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर आणि सत्तांतराच्या प्रक्रियेत नेत्यांचे बिघडले सूरताल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:37 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील राजकारणाचा गेल्या दोन महिन्यातील उलथापालथ आणि घडामोडींनी जिल्ह्यातील राजकारणातही मोठय़ा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील राजकारणाचा गेल्या दोन महिन्यातील उलथापालथ आणि घडामोडींनी जिल्ह्यातील राजकारणातही मोठय़ा प्रमाणावर  परिणाम झाला असून त्यातून पूर्वी सूर जुळलेल्या अनेक नेत्यांचे सूर आता बिघडणार असल्याचे चित्र आहे. विशेषत: निवडणूकपूर्वी झालेले पक्षांतर आणि निवडणुकीनंतरचे सत्तांतर अनेकांचा राजकीय जिवनात परिणाम करणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपची चलती होती. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजप-शिवसेना युतीलाच बहुमत मिळेल व हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे चित्र असल्याने निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यात काँग्रेसमधून तत्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्यासह अनेक पदाधिका:यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तर आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या घडामोडीतच उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या दरम्यान सर्वात मोठी राजकीय घटना घडली ती म्हणजे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांची 25 वर्षापासूनची राजकीय दुष्मनी संपली आणि ते एकमेकांचे मित्र झाले. ही मैत्री इतकी घट्ट की काहीही झाले तरी एकमेकांपासून दूर न जाण्याचा संकल्प त्यांनी जाहिरपणे व्यासपीठावरूनही बोलून दाखविला. त्यामुळे आगामी काळात  जिल्ह्याच्या विकासाला मोठा फायदा होईल अशी सर्वानाच आशा लागली आहे. या पाश्र्वभुमीवर निवडणूक निकालानंतर युतीला बहुमत तर मिळाले पण सरकार स्थापन करतांना मात्र ही युती तुटली. व ज्या काँग्रेसला सोडून कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले ती काँग्रेस मात्र राज्यात सत्तेत येणार आहे. ज्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात निवडणूक काळात कार्यकर्ते नव्हते ती राष्ट्रवादी देखील आता सत्तेत येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालून घेण्यासाठी अनेक नेते पुढे सरसावत असल्याचे चित्र आहे.  चंद्रकांत रघुवंशी यांनी मात्र भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश केल्याने ते फायदेशीर ठरले आहेत. शिवसेनेत प्रवेशाने मात्र जिल्ह्यातील राजकारणातही अनेक परिणाम जाणवणार आहेत. एरव्ही त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून एक वेगळी छाप होती. आता मात्र काँग्रेसचा काही स्थानिक नेत्यांशी सूर जुळवतांना कसरतच होणार आहे. विशेषत: त्यांच्या राजीनाम्याने प्रभावी झालेले आमदार अॅड.के.सी.पाडवी यांचा विरोधात अक्कलकुवात शिवसेनेचा उमेदवार असल्याने रघुवंशींनी पाडवींना हरविण्यासाठी पुर्ण शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीत निश्चितच दरार आला आहे. नंदुरबारमध्ये रघुवंशी व गावितांचे मनोमिलन झाले असले तरी राज्याच्या सत्तेत भाजप विरोधात राहणार असल्याने ही मैत्री टिकविण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. खास करून नुकत्याच होणा:या जिल्हा परिषद निवडणुकीत ही कसब पणाला लागणार आहे. उदेसिंग पाडवी काँग्रेसमध्ये आले असले तरी स्थानिक स्तरावर पद्माकर वळवी यांच्याशी जुळवून घेण्यात त्यांना कसरत करावी लागणार आहे. किंबहुना त्यांच्या नात्यातील कुणकूण सुरू  झाली आहे. एकुणच जि.प. निवडणुकीच्या राजकारणात या सा:या बाबींचा  परिणाम होणार असल्याने आता हे राजकारण कसे वळण घेते त्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.