शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

उमराण जिल्हा परिषदेच्या गटात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी शिरिषकुमार ...

उमराण जिल्हा परिषदेच्या गटात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी शिरिषकुमार नाईक बोलत होते. याच गटात आमदार शिरिषकुमार नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत व सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकास अंतर्गत विकास कामे मंजूर केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, मधूकर नाईक, दारासिंग गावीत, दशरथ गावीत, प्रकाश नाईक, विनोद नाईक, राजेश कोकणी, गोरजी गावीत, मनोज वळवी, अजित वसावे, दिलीप वळवी, ईसाब गावीत, सरू महाराज, मोतीराम नाईक, नरपत वसावे, कृष्णा वसावे, जालमसिंग गावीत, राहूल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार शिरिषकुमार नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२०-२०२१ अंतर्गत उमराण जिल्हा परिषद गटासाठी विविध कामे मंजूर केली आहे. या वेळी उमराण गटातील जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, भरडू गटातील मधुकर नाईक नागरिकांच्या संपर्कात असून, ते गावातील भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रीत करून गावाचा विकास करण्यास प्राधान्य देत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अशी आहेत विकास कामे

जनसुविधांतर्गत पाचंबा, आमलाण, नवागांव येथे रस्ता काॅक्रिटीकरण, डोकारे येथील अंबे माता मंदिर परिसरात पेव्हर ब्लाॅक बसविणे व रस्ता काॅक्रिटीकरण करणे, किमान गरजा कार्यक्रमांतर्गत वाटवी ते डोकारे आदिवासी सहकारी कारखाना रस्ता, आमलाण ते मोगलबारा रस्ता, बेटकी ते आमलाण रस्ता, डोकारे डालीअंबा चेडापाडा रस्ता, डोकारे ते स्मशानभूमी रस्ता, मेनतलाव ते स्मशानभूमी रस्ता.

लघूसिंचन विभागांतर्गत डोकारे येथील सरपणी नदीवर साठवण बंधारा, वाटवी (पाचंबा) नाल्यावर साठवण बंधारा करणे.

पाणीपुरवठा विभागांतर्गत बिलीपाडा येथे नळपाणी पुरवठा योजना करणे, बिलगव्हाण, बिलबारा, पाचंबा, करंजवेल, बेटकी, चेडापाडा, तिनमौली येथे कुपनलिका विहीर करणे.

दरम्यान, तिनमौली, बिलीपाडा, बिलबारा, सुकवेल व नवागांव येथे पथदिवे बसविणे. तसेच पाचंबा, करंजवेल, कोकणीपाडा, डोकारे, सुकवेल, बिलबारा, बिलीपाडा येथे खुले व्यायामशाळा साहित्य बसविणे, नवागाव येथे संरक्षण भिंत बांधणे.

उमराण येथे नवीन अंगणवाडी बांधकाम करणे, उमराण व वावडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दुहेरी पंप बसविणे.