लसीकरण जनजागृती अभियान रथाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST2021-05-01T04:28:58+5:302021-05-01T04:28:58+5:30

यावेळी विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पाटील, ...

Launch of Vaccination Awareness Campaign | लसीकरण जनजागृती अभियान रथाचा प्रारंभ

लसीकरण जनजागृती अभियान रथाचा प्रारंभ

यावेळी विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पाटील, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास चव्हाण व आय.एम.आर.डी.चे संचालक प्रा. अनिल पाटील यांच्यासह अभियानात सहभागी असलेल्या विविध संस्थांचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. कोविड लसीकरण जनजागृती अभियान शहादा तालुका एज्युकेशन संस्था संचलित विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाऊंडेशन मुंबई, जिल्हा परिषद नंदुरबार, सीवायडीए संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे.याची सुरुवात नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व प्रांत अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी केली. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रत्येक आठवड्यात दोन दिवस शहादा शहर, परिसर व त्यानंतर उर्वरित बाकी दिवसांत नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव तालुक्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संस्थांचे पदाधिकारी कोविड लसीकरणबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सजवलेल्या रथावर वेगवेगळे जागृती करणारे छायाचित्रे लावलेली आहेत. काेवीड लसीकरण बाबत ज्या अफवा पसरवण्यात आल्या, त्याबाबत जागृती निर्माण केली जाईल. काेराेनाचा संसर्ग झाल्यास कोणती उपाययोजना करावी, याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

कोविड लस घेण्याबाबत नागरिकांनी आपल्या मनात इच्छा जागृत करावी, मृत्यूचे प्रमाण वाढल्याने लस अत्यावश्यक आहे यासाठी शासन आपल्या दरबारी आले आहे. त्याचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा, त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी दिली. प्रांत अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी शासनाने मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. प्रत्येकाने लस घ्यावी. जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सुरुवातीला लसीकरण झाल्याने मृत्यूदर नगण्य झाला आहे. मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Launch of Vaccination Awareness Campaign