शहादा येथे नवीन लसीकरण केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:14+5:302021-05-05T04:50:14+5:30

शहरातील शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ डॉ. गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. ...

Launch of new vaccination center at Shahada | शहादा येथे नवीन लसीकरण केंद्राचा शुभारंभ

शहादा येथे नवीन लसीकरण केंद्राचा शुभारंभ

शहरातील शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ डॉ. गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. चे माजी सभापती अभिजित पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक संदीप पाटील, प्राचार्य आय. डी. पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. मणिलाल शेल्टे, डॉ. के. जी. पाटील व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. गिरासे म्हणाले की, शासनातर्फे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरणाला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. अभिजित पाटील म्हणाले की, शहरवासीयांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाच्या मदतीने विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ऑनलाइन नोंदणीची सोय करण्यात आली असून जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

Web Title: Launch of new vaccination center at Shahada