अंगणवाडीत चोरी १७ हजारांचे साहित्य झाले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:34+5:302021-05-15T04:29:34+5:30

नंदुरबार : रोषमाळबुद्रूकचा जेलसिंगपाडा व रोझरीपाडा येथील अंगणवाडीतून चोरट्यांनी १७ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात ...

Lampas looted 17,000 items in Anganwadi | अंगणवाडीत चोरी १७ हजारांचे साहित्य झाले लंपास

अंगणवाडीत चोरी १७ हजारांचे साहित्य झाले लंपास

नंदुरबार : रोषमाळबुद्रूकचा जेलसिंगपाडा व रोझरीपाडा येथील अंगणवाडीतून चोरट्यांनी १७ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, जेलसिंगपाडा व रोझरीपाडा येथील अंगणवाडीतून चोरट्यांनी साहित्य लंपास केले. अंगणवाडी सेविका सकीबाई मोहन पावरा या नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या असता त्यांना तेथे चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली असता उपयोग झाला नाही. चोरी झालेल्या साहित्यामध्ये टीव्ही, इन्व्हर्टर, फॅन, बॅटरी, पोषण आहार यासह इतर साहित्य असा एकुण १७ हजार रुपये किंमतीचे साहित्य आहे.

याबाबत सकीबाई मोहन पावरा यांनी फिर्याद दिल्याने धडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दिलीप महाजन करीत आहे.

दरम्यान, बालकांचे साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Lampas looted 17,000 items in Anganwadi