बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST2021-04-18T04:30:09+5:302021-04-18T04:30:09+5:30

नंदुरबार : शहरातील संत दगा महाराज नगरातील बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ४६ हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची ...

Lampas broke the lock of a closed house and stole Rs 1.5 lakh | बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

नंदुरबार : शहरातील संत दगा महाराज नगरातील बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ४६ हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रानुसार, नंदुरबार शहरानजीकच्या नळवा शिवारातील संत दगा महाराज नगरातील प्लॉट क्रमांक ५७ मध्ये राहणारे सचिनकुमार मनोहर बोरसे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाच्या शोकेसमधील एक लाख १४ हजार किमतीचे सोन्याचे दागिने व ३२ हजार रुपये रोख असा एक लाख ४६ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद सचिनकुमार बोरसे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनला दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे हे करीत आहेत.

Web Title: Lampas broke the lock of a closed house and stole Rs 1.5 lakh