शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याअभावी डोंगरातून हाेतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

तळोदा तालुक्यातील अक्राणीमहल ते केलीपानी, बेडवाई, विहीरीमाळ ते अलवान असा रस्ता नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्य ...

तळोदा तालुक्यातील अक्राणीमहल ते केलीपानी, बेडवाई, विहीरीमाळ ते अलवान असा रस्ता नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्य डोक्यावर घेऊन डोंगर माथ्याच्या पायवाटेने न्यावे लागते. अक्रानीमहल ते केलीपाणी दोन किलोमीटर, केलीपाणी ते बेडवाई अडीच किलोमीटर, बेडवाई ते विहीरीमाळ तीन किलोमीटर व विहिरीमाळ ते अलवान चार किलोमीटर असा पूर्ण रस्ताच नसल्याचे चित्र आहे. यामुळे अक्रानीमहलसह सिंधवाईपाडा, मोतीपाडा, पाटीलपाडा, खाकरबारीपाडा, पुंजारापाडा, बामणदेवपाडा, उमरदेवपाडा, दरवाजापाडा, केलीपाणी थेवापाणी, केलापाणी, पातीलपाडा व विहिरीमाळ बेडवाई, देव आवलीपाडा, सिंधवाई पाडा, बारीपाडा, राहिपाडा, मालपाडा व अलवान मोठीबारी, बोरिपाडा या गाव पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह, शेतीचे साहित्य, खते व बियाणे, घर बांधकामासाठी लागणारे साहित्य डोक्यावरच चढवून खडतर पायवाटेने डोंगर माथ्यावरून न्यावे लागत आहे. दरम्यान या भागात कोणाचा विवाह सोहळा असल्यास लग्नमंडप व इतर साहित्य हे डोक्यावर वाहून नेण्याची वेळ येते. अक्राणीमहल ते अलवान असा रस्ता व्हावा यासाठी येथील राकेश पटले, सायसिंग ठाकरे, रमेश ठाकरे, दारासिंग ठाकरे पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील गावा पाड्यातून कोणी आजारी पडल्यास त्याला खांद्यावर बसवून अथवा झोळी करून तळोद्याच्या दिशेने न्यावे लागत आहे.