लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील इटवाई येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.कमलेश बालाजी गावीत (१८) रा.ईटवाई असे शेतमजुराचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पाऊस पडत असताना ईटवाई गावाच्या शिवारातील शांतीलाल कोकणी यांच्या शेतातील वडाच्या झाडाखाली उभा होता. अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली या घटनेत कमलेश गावित हा जागीच ठार झाला. विसरवाडी पोलीस ठाण्यात त्यांचे वडिल बालाजी दावा गावित यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार सुरेश चौरे करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}