शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्द झाल्याने क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयाच्या विरोधात नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या ...

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयाच्या विरोधात नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील जुनी नगरपालिकेजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या पदरी आरक्षण रद्दची निराशा पडली आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र व राज्य सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण मराठे यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठा समाजाला प्रगती व विकासाच्या दृष्टीने भारतीय संविधानानुसार आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी समस्त मराठा समाजाने राज्यभर आंदोलने केली होती. या आंदोलनांवेळी काही मराठा समाजातील युवकांनी बलिदानही दिले आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी संयमाने न्यायालयीन लढाई दिली; परंतु केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर न केल्याने मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकलेे नाही. यामुळे सर्वोेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने मराठा समाजाच्या पदरी संघर्षानंतर पुन्हा आरक्षणाच्या बाबतीत निराशाच आली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नंदुरबार येथील जुनी नगरपालिका परिसरात क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी न्यायासाठी लढा देेऊच, समाजातील युवकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महेश मराठे, पप्पू मराठे, निलेश जगताप, यशराज मराठे उपस्थित होते.