शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोंढावळ गावात एकाच दिवसात ४९ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

कोंढावळ : गेल्या आठ दिवसांपासून गावात मलेरिया, टायफाईडसह कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत असून, दोन जणांचा ...

कोंढावळ : गेल्या आठ दिवसांपासून गावात मलेरिया, टायफाईडसह कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत असून, दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात आरोग्य विभागातर्फे २७ मार्च रोजी ११४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ४९ जणांचा अहवाल ३१ मार्च रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार दिवसांत या ४९ लोकांचा किती जणांशी संपर्क आला हे शोधून काढणे जिकिरीचे झाले आहे. गुरुवारी दुपारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी व आशा सेविकांनी गावातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन गोळ्यांचे वाटप केले. यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता.

एकाच दिवशी ४९ जणांचा पाॅझिटिव्ह अहवाल आल्याने प्रशासनाने एकाही रुग्णाला रुग्णालयात नेले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आपला जीव गमवावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावेळी महसूल प्रशासनातर्फे गावाला नाेटीस देण्यात आली असून, १ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत गावात लाॅकडाऊन घोषिक करण्यात आले असून, या बंद कालावधीत अत्यावश्यक सुविधेव्यतिरिक्त कोणतीही प्रतिष्ठाने सुरू राहणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी लक्ष्मण भिल, डिगंबर माळी, पोलीस पाटील सुरेशगीर बावा, मंडळ अधिकारी विजय साळवे, एस. आर. सावळे, महेश ठाकरे, धनंजय वळवी, राकेश माळी, नवनीत माळी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आदींनी गावात पाहणी केली.

तीन वर्षांपासून बंद पडलेला फिल्टर प्लॅन सुरू करा

गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेला फिल्टर प्लॅन गेल्या तीन वर्षांपासून बंदावस्थेत पडून आहे. तो लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्लॅनमुळे गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.