कोरोनाच्या दुस-या लाटेत केवळ महिनाभरात ५५ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:53+5:302021-03-27T04:31:53+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता १५ हजार झाली आहे. यातील २७० जणांचा मृत्यू झाला आहे. दर ...

In just one month, 55 people lost their lives in the second wave of Corona | कोरोनाच्या दुस-या लाटेत केवळ महिनाभरात ५५ जणांनी गमावले प्राण

कोरोनाच्या दुस-या लाटेत केवळ महिनाभरात ५५ जणांनी गमावले प्राण

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता १५ हजार झाली आहे. यातील २७० जणांचा मृत्यू झाला आहे. दर दिवशी मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यात मृत्यूदर हा दोन टक्क्यांपर्यंत जावून पाेहोचला आहे. जिल्ह्यातील या मृत्यूंचा आढावा घेतला असता, मार्च महिन्यात महिन्यात ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या एक महिन्यात मयत झालेल्यांचे वर्गीकरण केल्यानंतर यातील सर्वाधिक मृत्यू हे पन्नाशी ओलांडलेल्या नागरीकांचे झाले असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरीकांच्या मृत्यूची संख्याही वाढली असल्याने जिल्ह्यातील नागरीकांच्या चिंतांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात रुग्णांची संख्या पाच हजाराने वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यू होणा-या रुग्णांच्या वयाचे अंतर दिवसेंदिव कमी होत असून चाळीशीत असलेल्यांचेही मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात २६ ते ५० वयोगटातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नंदुरबार येथील सर्वाधिक ५ तर नवापूर, शहादा, तळोदा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ५१ ते ७५ या गटात सर्वाधिक ३५ जणांचे मृत्यू झाले आहेत. यात नंदुरबारात सर्वाधिक १८, नवापूरात २, शहादा ११ तर तळोदा येथील चाैघांचा समावेश आहे. ७६ ते पुढील वयाच्या एकूण १२ जणांचा मार्च महिन्यात मृत्यू झाला. यात सर्वाधिक सात जण हे नंदुरबार, १ नवापूर, तीन शहादा तर एक तळोदा येथील आहे. नंदुरबारात महिनाभरात सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू झाला.

पन्नाशीतील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. नागरीकांनी कोविडच्या तपासण्या करुन घेत तातडीने उपचार घेतले पाहिजेत. उपचारांना उशिर न करता, काय लक्षणे आहेत हे आपल्या डाॅक्टरसोबत चर्चा करुन घेतल्यास पुढील धोका टळतो.

-डाॅ. के.डी.सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: In just one month, 55 people lost their lives in the second wave of Corona