शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या भूमिपूजनाने स्वप्नपूर्तीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी केले.नकट्यादेव येथे असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, जि.प. सदस्य प्रताप वसावे आदी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड.पाडवी म्हणाले की, तीन वर्षांचा असतांना या रस्त्यावरुन सर्वप्रथम पायी चाललो होतो.   त्यावेळी आम्ही पाच विद्यार्थी २८ किलोमीटरचे अंतर पायी चालायचो. शिक्षण घेतल्यानंतर या रस्त्याचे काम व्हावे, अशी इच्छा मनात होती   ती आज पूर्ण होत आहे. या    रस्त्यासाठी १३ कोटी ६१ लाख रुपये खर्च होणार असून रस्त्याची लांबी १८ किलोमीटर आहे. रस्त्यामुळे तीन तालुक्यांना लाभ होईल. तालुका किंवा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन एका दिवसात परत येणे आता शक्य होणार आहे. काकडदा-अक्राणी महाल किल्ला-तुळजा- तळोदा रस्त्याच्या कामालाही लवकरच मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, पालकमंत्री पाडवी यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. वीज, पाणी आणि आरोग्य सेवादेखील पोहचल्या आहेत. असलीपासून जाणाऱ्या या रस्त्यामुळे धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील जनतेला फायदा होईल. यावेळी माजी मंत्री ॲड.पद्‌माकर वळवी, दिलीप नाईक, विक्रम पाडवी, सी.के. पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य देण्यात येणारपारंपरिक पध्दतीने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशातील आदिवासी नृत्य आणि आदिवासी वाद्य हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचे पॅकेजिंग करण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२०-२१ अंतर्गत अर्थसहाय्याचा शुभारंभ पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. एकूण २८ आदिवासी शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ॲड.पाडवी यांना यावेळी स्ट्रॉबेरीची टोपली भेट दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते दलित साहित्य अकादमी छत्तीसगड यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार सी.के. पाडवी आणि बिरसा मुंडा समता पुरस्कार प्रताप वसावे यांना प्रदान करण्यात आला.