याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्र पिकअप गाडी (क्रमांक एमएच ३९ एडी ११३६) मध्ये भुईमूग शेंगा भरून तळोदाकडे येत असताना टेबरीपाडाजवळ गाडीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चांदसैली रस्त्यावरून टेबरीपाडा वळण रस्त्याजवळ डोंगराच्या कडेला धडक होऊन जागेवर पलटी झाली. हा अपघात कोठार ते चांदसैली रोड रस्त्यादरम्यान घडला. या अपघातात पिकपचा उजव्या बाजूच्या पत्रा वाकून व समोरील बाजूस किरकोळ नुकसान झाले अपघातात कोणासही दुखापत झाली नाही. पिकअप चालक किसन भामटा पावरा याने तळोदा पोलिसात खबर दिल्यावरून मोटर अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक राजधर जगदाळे हे करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}