शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच तळोदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पानी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन ...

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका असते. रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगसपूर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी जलसाठा क्षमता आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाऱ्या दमदार पावसामुळे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. मात्र या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून, या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून साठवण भिंतीना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

या प्रकल्पात असणाऱ्या जलसाठ्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी व खरीप अनुदान अवलंबून असते. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकऱ्यांना वापर करता येत नाही.

दरवर्षी या प्रकल्पांची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असते, परंतु या प्रकल्पांच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अद्याप कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबधितानी लक्ष देण्याची गरज आहे.

सिंचन प्रकल्पांना गळती

दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही सिंचन प्रकल्पांना असलेल्या गळतीमुळे प्रकल्पातील जलसाठा अल्पजीवी ठरत आहे. पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्प तळ गाठतात . प्रकल्पांना असणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.