शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मयत वृद्धाच्या संपर्कातील सात जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर/लोणखेडा : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाचा संसर्ग होवून मृत्यू झाला होता़ यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर/लोणखेडा : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाचा संसर्ग होवून मृत्यू झाला होता़ यानंतर आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत़ दरम्यान खापर ता़ अक्कलकुवा येथील दोघ वृद्धाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे़आरोग्य विभागाने लोणखेडा गावात सतर्कता म्हणून ११ पथकांची नियुक्ती केली आहे़ लोणखेडा गावात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे़ या काळात दवाखाने व मेडिकल सुरु राहणार आहेत. सकाळी व सायंकाळी एक तास दुग्धव्यवसाय सुरु राहणार आहे. मुंबई येथे जावयाकडे आलेल्या मयत वृद्धाला इतरही आजार होते. दरम्यान त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने होम क्वारंटाईन केले गेले होते. परंतू प्रकृती बिघडल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथे उपचाराचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता़ मयत वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्यापासून तालुका आरोग्य विभागाचे पथक लोणखेड्यात ठाण मांडून आहे़ रोहिदासनगर परिसर सील करुन फवारणी करण्यात आली आहे. याआधी शहादा येथील एक पॉझिटीव्ह रुग्ण ईदनिमित्त नातलगांना भेटण्यासाठी लोणखेडा येथे येऊन गेला होता़ यामुळे गावात दुसऱ्यांदा उपाययोजनांना करण्यात आली आहे़ सरपंच शांताबाई भिल, उपसरपंच कल्पना पाटील, ग्रामसेवक दिनकर नाईकनवरे, तलाठी देसले, नगरसेवक प्राचार्य मकरंद पाटील, अशोक टिला पाटील, हरी लिमजी पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वेळोवेळी गावात भेटी देऊन माहिती घेत आहेत़खापरचे दोघे मयताच्या आले संपर्कातलोणखेडा ता़ शहादा येथील कोरोनाबाधित मयत वृद्धाच्या संपर्कात आलेल्या खापर ता़ अक्कलकुवा येथील दोघांना सोमवारी रात्री क्वारंटाईन करण्यात आले़ क्वारंटाईन केलेल्या दोघांपैकी एक मयताचा भाऊ तर दुसरा त्याचा नातेवाईक आहे़ त्याच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी दोघेही लोणखेडा येथे गेले होते़ तेथून परतल्यानंतर दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे़ दोघांनाही क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत़ या प्रकारामुळे खापर परिसरात चिंता व्यक्त होत होती़ या भागात अद्याप एकही कोरोना संसर्गित व्यक्ती आढळलेली नाही़ दोघे क्वारंटाईन झाल्याने गावात याची चर्चा सुरु होती़प्रतापपूरच्या १० जणांना अंत्ययात्रेत जाणे पडले महागलोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथून बाम्हणे ता़ शिंदखेडा येथे अंत्ययात्रेत गेलेल्या १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ बाम्हणे येथील मयत कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आल्यानंतर मंगळवारी तातडीने ही कारवाई करण्यात आली़बाम्हणे ता़ शिंदखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्यानंतर १४ रोजी त्याचे १० नातेवाईक प्रतापपूर येथून गेले होते़ हे सर्व परत आल्यानंतर मयत हा कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते़ यानंतर या सर्वांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने आमलाड येथे हलवले आहे़ त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़