खेतिया येथे बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:26 IST2020-05-14T10:26:05+5:302020-05-14T10:26:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर गावाहुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ...

Investigation of out-of-towners at Khetia | खेतिया येथे बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणी

खेतिया येथे बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : खेतिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर गावाहुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या वेळी पाचोरा येथून आलेल्या २९ मजुरांची तपासणी करण्यात आली. यात महिला, पुरूष व लहान मुला-मुलींचा समावेश होता. तसेच दोन गरोदर महिलांचाही समावेश होता. हे मजूर सापखड़की, ता.पानसेमल येथील रहिवासी असून, ते पोटाची खळगी भरण्यासाठी पाचोराकडे गेले होते.
खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची थर्मल स्कॅनिंग व पल्सरेट मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच खेतिया व खेड़दिगर तपासणी नाक्यावर या मजुरांची नोंदणी करण्यात आली.
या वेळी खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अमन मोदी, डॉ.नेहा आर्य, औषधनिर्माण अधिकारी कुलदीप ठाकरे, मनु जैन, दिनेश चौहान, अरविंद शितोळे, चेतन ठाकूर, परिचारिका अनिता बघेल, गायत्री घिरोडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून नोंदणी केली जात आहे. लोकडाऊच्या कालावधीत बाहेरून आलेल्या मजुरांना खेतिया येथील श्रीराम बागुल, केतन चौहान, अरूणनाथ वंजारे यांनी त्यांच्या वाहनांनी घरापर्यंत पोहोचविले.

Web Title: Investigation of out-of-towners at Khetia