५०७ ग्रामपंचायती डिजीटल इंडियांतर्गत इंटरनेटने जोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:03 IST2020-06-10T12:02:31+5:302020-06-10T12:03:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डिजीटल इंडियांतर्गत जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देण्यात आले असून यातील १० ग्रामपंचायती ह्या ...

Internet connected under 507 Gram Panchayats Digital India | ५०७ ग्रामपंचायती डिजीटल इंडियांतर्गत इंटरनेटने जोडल्या

५०७ ग्रामपंचायती डिजीटल इंडियांतर्गत इंटरनेटने जोडल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डिजीटल इंडियांतर्गत जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देण्यात आले असून यातील १० ग्रामपंचायती ह्या प्रत्यक्ष इंटरनेटचा वापर करुन कामकाज करत असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दिली़ दिशा समितीच्या दोन दिवसीय बैठकीत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़
माहिती देताना त्यांनी सांगितले की, दोन दिवसीय बैठकीत ३० योजनांचा आढावा घेण्यात आला़ यात प्रामुख्याने मोबाईल कनेक्टीव्हीटी या समस्येवर भर देण्यात येऊन दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना दुर्गम भागासह जिल्ह्यातील अडचणी दूर करण्याबाबत सूचना केल्या आहेत़ धडगाव तालुक्यात २६, अक्कलकुवा ४९, नंदुरबार १३८, नवापुर ९५, शहादा १४५ तर तळोदा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती भारत नेट योजनेंतर्गत डिजीटल झाल्या आहेत़ यातील १५० ग्रामपंचायती ह्या जुलै महिन्यापासून पूर्णपणे इंटरनेटचा वापर करुन कामकाज करणार आहेत़ या सर्व ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत़ दरम्यान जिल्ह्यात विधवा, निराधार, परित्यक्त्या आणि दिव्यांगानां पेन्शन देण्याचे कामकाज पूर्ण झाले असून ५५ हजार ३५० जण त्यांचा लाभ घेत असल्याची माहिती त्यांनी दिली़
शेवटी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी स्वतंत्र रॅक पॉइंटचे बांधकाम वेगात सुरु असून ९ महिन्यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकात हा रॅक पॉइंंट सुरु होणार आहे़ यामुळे मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल़ सोबत वनपट्टेधारकांना कृषीपंप योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातबाºयावर परवानगी म्हणून स्थानिक वनपालांनी परवानागीपत्रे द्यावीत अशा सूचनाही केल्या आहेत़

Web Title: Internet connected under 507 Gram Panchayats Digital India