शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रेवानगर ग्रामपंचायत कारभारात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

तळोदा तालुक्यातील रेवानगर ग्रामपंचायतीच्या कारभारात बाहेरील व्यक्तींचा जास्तीच्या हस्तक्षेपाबाबत पं.स. सदस्य दाज्या पावरा व ग्रा.पं. सदस्य तेहरसिंग पावरा ...

तळोदा तालुक्यातील रेवानगर ग्रामपंचायतीच्या कारभारात बाहेरील व्यक्तींचा जास्तीच्या हस्तक्षेपाबाबत पं.स. सदस्य दाज्या पावरा व ग्रा.पं. सदस्य तेहरसिंग पावरा यांनी तहसीलदार गिरीष वाखारे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांना न बसवता सत्तेबाहेरील कार्यकर्त्यांना बसवितात. एवढेच नव्हे कामकाजात भाग घेऊन ढवळाढवळदेखील करतात. शिवाय बेकायदेशीर कामे करण्यास भाग पडतात. याचे सरपंच व ग्रामसेवक अवलोकन करीत नाही म्हणजेच त्यांची एकप्रकारे मूकसंमतीच आहे. विविध विषयांवर हेच व्यक्ती मध्यस्थी करतात. १८ मे रोजी पार पडलेल्या सभेत ग्रामपंचायत सदस्य तेहरसिंग पावरा यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या व अडचणी लेखी स्वरूपात सादर केल्या होत्या. परंतु सदस्य नसलेले चिमा पावरा, नाथ्या पावरा, डेमशा पावरा यांनी त्याची खिल्ली उडविली. ‘तुम्ही कितीही अर्ज द्या, तुमची कामे होऊ देणार नाहीत’ असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली होती. यावर सरपंचांनी काहीच दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कोरोनाबाबत गावातील लोकांमध्ये नकारात्मकता आहे. त्यावर जनजागृती केली जात नाही. शिवाय गावातील बहुसंख्य हातपंप नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईही निर्माण झाली आहे. महामारीमुळे ग्रामसभा झालेली नाही. मागील चार-पाच महिन्यात मासिक सभा झालेल्या आहेत. त्या सभांमध्ये सदस्य नसलेल्यांना बसविण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर प्रकाराला कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, तेहरसिंग पावरा, पिंटू पावरा, दुरशा पावरा, बारक्या पावरा, लेहाऱ्या पावरा, मिनेश पावरा, रुमाल्या पावरा यांनी केली आहे.