शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या साधन सामुग्रीवर दिला जातोय लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:00 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन राज्यांच्या सिमा असलेला, पश्चिम रेल्वेचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक, तीन महामार्ग गेलेला ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन राज्यांच्या सिमा असलेला, पश्चिम रेल्वेचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक, तीन महामार्ग गेलेला जिल्हा यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा मोठा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. आधीच सोयी व साधनांची कमतरता असतांना त्यावर मात करीत प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व बाबी पडताळून पाहिल्या जात असून आता नागरिकांनी स्वत: काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.नंदुरबार जिल्हा दोन राज्यांच्या सिमेवरील जिल्हा आहे. अनेक गावे दोन्ही राज्यांच्या अंतर्गत भागात असल्याने दैनंदिन व्यवहार करतांना नागरिकांना दोन्ही राज्यातील गावांमधून ये-जा करावी लागते. अशीच स्थिती प्रवासी वाहतुकीची देखील आहे. रेल्वे आणि बस वाहतुकीसह खाजगी वाहतुक करतांना देखील मोठी रिस्क आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.अपुºया साधनसामुग्रीवर कसरतजिल्हा प्रशासनाकडे पुरेशी वैद्यकीय सामुग्री उपलब्ध नाही. आहे त्या साधनांवर योग्य प्रकारे नियोजन करून सेवा दिली जात आहे. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे सर्व यंत्रणेवर मॉनिटरींग करीत आहे. आजच्या स्थितीत जिल्हा रुग्णालयात केवळ ३९ आयसीयूचे बेड आहेत. नंदुरबार, शहादा येथील खाजगी डॉक्टरांकडील आयसीयू बेडची संख्या ही ५४ आहे. असे एकुण केवळ ९३ आयसीयू बेड जिल्हाभरात उपलब्ध आहे. साथीचा फैलाव झालाच तर मोठी कसरत ठरणार आहे. अशीच स्थिती व्हेंटीलेटरची देखील आहे. शासकीय रुग्णालयातील पाच आणि खाजगी रुग्णालयातील १४ असे केवळ १९ व्हेंटीलेटर जिल्हाभरात उपलब्ध आहेत. थर्मल स्कॅनर केवळ सहा उपलब्ध आहेत. आणखी २० स्कॅनरची मागणी करण्यात आली आहे. आज, उद्यामध्ये ते उपलब्ध होतील. व्हेंलिटरची मागणी देखील करण्यात आली असून सुरत येथून ते खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तालुकास्तरावरविलगीकरण कक्षएकाच वेळी २०० पेक्षा अधीक पेशंट आल्यास त्यांची व्यवस्था व्हावी, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जावे यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था नाही. परिणामी विद्यार्थी होस्टेलचा पर्याय निवडण्यात आला आहे. यात पॉलिटेक्निक कॉलेज नंदुरबारमधील ३० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीगृह नवापूर येथे ४० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलींचे वस्तीगृह नवापूर ३० खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह शहादा ८० खोल्या, आदिवासी मुलींचे वस्तीगृह खापर २४ खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह आमलाड ता.तळोदा ४० खोल्या आणि आदिवासी मुलांचे वस्तीगृह मांडवी बु. ता.अक्राणी येथील ३० खोल्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.सहा ठिकाणी पथके तैणातजिल्हा आणि राज्याच्या सिमेवर सहा ठिकाणी पथके तैणात करण्यात आली आहेत. परराज्यातून जिल्ह्यात येणाºया प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. यासाठी गुजरात राज्याच्या सिमेवर वाका चार रस्ता व बेडकी, ता.नवापूर व गव्हाळी, ता.अक्कलकुवा येथे पथक आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर रायखेड, ता.शहादा येथे पथक कार्यान्वीत आहे. याशिवाय इतर दोन ठिकाणी पथके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सध्या लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे व बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकातील आरोग्य पथके काढून घेण्यात आली आहेत.इतर सुविधा४थर्मल स्कॅनर : ६, प्रस्तावीत : २०४आयसीयू बेड-शासकीय : ३९, खाजगी : ५३४व्हेंटीलेटर-शासकीय : १४, खाजगी : १९तयार केलेले विलगीकरण कक्षपॉलिटेक्नीक कॉलेज, नंदुरबारवरिष्ठ महा.वसतीगृह, नवापूरमुलींचे वसतिगृह, नवापूरमुलांचे वसतिगृह, शहादामुलींचे वसतिगृह, खापरमुलांचे वसतिगृह, आमलाड-तळोदामुलांचे वसतिगृह, मांडवी, अक्राणीसध्य स्थितीत जिल्हा रुग्णालयात ३२ बेडचे विलगीकरण कक्ष सुरू.